- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेला कुठल्याही दहशतवादी गटाने लक्ष्य केल्याची बातमी नाही. त्यामुळे स्पर्धेचा उद्गाटन सोहळा ठरल्याप्रमाणे सीन नदीच्या काठावरच होणार असल्याचं फ्रेंच क्रीडामंत्र्यांनी बुधवारी स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यात रशियात मॉस्को इथं एका थिएटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेवरही जगभरात चर्चा झाली होती. पण, आता फ्रेंच सरकारने पुढे येऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Paris Olympics 2024)
२६ जुलैला पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. ‘ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांना सध्या तरी कुणी धमकी किंवा इतर कुठला इशारा दिलेला नाही. गुप्तचर खात्याचा अहवालही प्रतिकूल नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रम आधीच्या नियोजनानुसारच होतील,’ असं फ्रेंच क्रीडामंत्री एमिलिया केस्टरा यांनी म्हटलं आहे. (Paris Olympics 2024)
(हेही वाचा – Manonmanyam Sundaram Pillai : तमिळनाडूचे राज्यगीत कोणी रचले ठाऊक आहे का ?)
ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान घडलेल्या घटना…
एरवी ऑलिम्पिक स्टेडिअमवर खेळाडूंच्या संचलनाने स्पर्धेचं उद्घाटन होत असतं. तीच पारंपरिक पद्धत आहे. पण, यंदा आयोजन समितीने सीन नदीच्या काठावर उद्घाटन सोहळा भरवण्याचा घाट घातला आहे. नदीच्या दोन्ही बाजूला ५,००,००० च्या वर प्रेक्षक असतील. आणि नदीतून मोठ्या बोटींवर स्वार झालेले खेळाडू उद्घाटनाचं संचलन करतील, अशी योजना आहे. (Paris Olympics 2024)
अर्थात, अचानक काही अडचणी उद्भवल्यास दुसरी योजनाही तयार ठेवण्यात आल्याचं एमिलिया यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी १९७२ आणि १९९६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान दहशतवादी गटांचे हल्ले झालेले आहेत. बाकी असे अनुभव विरळाच आहेत. १९७२ चा हल्ला हा इस्त्रायलच्या खेळाडूंवर झालेला जीवघेणा दहशतवादी हल्ला होता. म्युनिच ऑलिम्पिकमध्ये ते थरारक नाट्य घडलं होतं. तर १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन स्थानिक दहशतवादी गटाने पाईप बाँब फोडला होता. त्यात दोन जणांनी जीव गमावला. तर शेकडो लोकांना आगीची धग सहन करावी लागली होती. अर्थात, मॉस्को हल्ल्यानंतर सध्या फ्रान्स सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्टवर असल्याचंही एमिलिया यांनी स्पष्ट केलं आहे. (Paris Olympics 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community