-
ऋजुता लुकतुके
कोलकाता संघासाठी सलग दुसऱ्या सामन्यात सुनील नरेनची (Sunil Narine) बॅट तळपली. आणि त्यामुळे स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या बुधवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर उभी राहिली. कोलकाताने दिल्लीसमोर ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला. आणि मग दिल्लीला १६६ धावांत गुंडाळत १०६ धावांनी विजयही पूर्ण केला. सर्वोच्च धावसंख्येच्या यादीत या सामन्याची नोंद होईलच. शिवाय मोठ्या फरकाचा विजय म्हणूनही हा सामना लक्षात ठेवला जाईल. (IPL 2024)
कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो सुनील नरेन. यावेळी फक्त ३९ चेंडूंत ८५ धावा करताना त्याने ७ षटकार आणि ७ चौकार लगावले. डावाच्या चौथ्याच षटकात सुनीलने ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ६, ६, ४, ०, ६, ४ अशी आतषबाजी करत २६ धावा वसूल केल्या. या षटकातच सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. (IPL 2024)
(हेही वाचा – Sanjay Nirupam : काँग्रेसमध्ये ५ सत्ताकेंद्रे जे एकमेकांशी भांडतात; संजय निरुपम यांचा घणाघात)
Sunil Narine at it again 🔥🔥@KKRiders are off to some start in Vizag!
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/UipTFUHznQ
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
डावखुऱ्या नरेनने पहिल्या दोन चेंडूंवर एक सरळ आणि दुसरा मिडऑनला षटकार वसूल केले. आणि त्यानंतर त्याने एक चौकारही वसूल केला. चौथा चेंडू निर्धाव पडला. पण, लगेचच पुढच्या दोन चेंडूंवर त्याने पुन्हा षटकार आणि चौकार ठोकला. नरेनने दुसऱ्या गड्यासाठी अंगरिक्ष रघुवंशीबरोबर १०४ धावांची भागिदारीही केली. यात अंगरिक्षचा वाटा ५४ धावांचा. अंगरिक्षचं हे आयपीएल पदार्पण होतं. आणि पहिलाच सामना त्याने गाजवला. (IPL 2024)
तर सुनील नरेन (Sunil Narine) ८५ धावांवर बाद झाला. पण, तोपर्यंत त्याने कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. ८५ ही सुनील नरेनची (Sunil Narine) वैयक्तिक सर्वोत्तम टी-२० धावसंख्या आहे. त्यालाच सामनावीराचा किताब मिळाला. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community