मुंबईतील इमारती आणि घरांच्या पाडकामाचा राडारोडा उचलून नेण्यायाठी महापालिकेने डेब्रीज ऑन कॉलची सुविधा दिल्यानंतरही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे डेब्रीज टाकले जाते. विशेष म्हणजे महापालिका डेब्रीजची विल्हेवाट देवनार किंवा अन्य जागी लावली जात असतानाच गोरेगाव येथे मोहन गोखले मार्गावर डेब्रीज टाकण्यासाठी स्वतंत्र डम्पिंग बनवले जात आहे. मात्र, या डम्पिंग गाऊंडची कल्पना महापालिकेलाच नसून राडारोड्याचा डोंगर तयार होत असतानही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिकेच्यावतीने केली जात नाही. (Goregaon Dumping Ground)
मुंबई महापालिकेने बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्तपण प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प हाती घेण्यात येत असून सध्या मुंबईत निर्माण होणारा राडारोडा हा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. परंतु मुंबईत अनेक जुन्या इमारतींची डागडुजी आणि पुनर्विकास केला जात असल्याने याच्या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक ट्रकमधून रस्त्यांवरच अनधिकृतपणे हे डेब्रीज रस्त्यावरच टाकून ट्रक चालक पळून जातात. परंतु आता तर डेब्रीजचे अनधिकृतच भराव भूमी अर्थात डम्पिंग गाऊंड गोरेगाव पूर्व भागात उभी राहत आहे. (Goregaon Dumping Ground)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये दीर आणि भावजय यांच्यात लढत)
डेब्रीज टाकण्याचा प्रकार सुरुच
गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जागेवर डेंब्रीजचे अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड उभे राहिले असून मागील अनेक महिन्यांपासून डेब्रीज टाकले जात आहे. डेब्रीजच्या या अनधिकृत भरावामुळे राडारोड्याचे डोंगर तयार झाले असून अद्यापही महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांचे याठिकाणी लक्ष नाही. तसेच या डम्पिंग ग्राऊंडवरील भराव टाकण्यास कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली नाही. परिणामी आजही याठिकाणी भराव टाकला जात जात आहे. संबंधितांविरोधात महापलिकेच्यावतीने कोणतीही कारवाई केली जात नसल्याने याठिकाणी डेब्रीज टाकण्याचा प्रकार सुरुच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Goregaon Dumping Ground)
विशेष म्हणजे याच्या काही अंतरावर शाळा असून याठिकाणी या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु आहे. त्यामुळे एक मार्गिकेचे काम सुरु असल्याने या मार्गावर आधीच वाहतूक कोंडी होते, त्यातच या वाहनांमुळे या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत असल्याचेही बोलले जात आहे. (Goregaon Dumping Ground)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community