उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. अनेक लोक सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पितात. यामुळे शरीर डिटॉक्स होते. तसेच वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लिंबूपाणी अनेक आजारांना दूर ठेवते. पण सर्वच लोकांसाठी लिंबूपाणी फायदेशीर नसून घातक ठरू शकते.
दातासंबंधित समस्या ज्या लोकांना दातासंबंधित समस्या असतात त्यांनी लिंबू पाणी पिणे टाळावे. लिंबूमध्ये असलेले अॅसिड दातांवर केलेले उपचार खराब करू शकते. यामुळे दातांचे दुखणे वाढू शकते. यामुळे दाताच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी पिणे टाळावे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हाडांच्या समस्या हाडांशी संबंधित समस्या असेल, तर लिंबू पाणी पिणे टाळावे. यामुळे हाडांची झीज होऊ शकते. लिंबामध्ये असलेले आम्ल हाडामध्ये जमा झालेले कॅल्शियम झपाट्याने नष्ट करू शकते. हे युरिनद्वारे बाहेर येऊ शकते. यामुळे हाडे कमकुवत होऊन पोकळ होऊ शकतात. यामुळे अपघातात हाडांना दुखापत झाल्यास लवकर नीट होत नाही.
किडनीचा आजार तुम्हाला किडनी संबंधित आजार असेल, तर लिंबूपाणी पिणे टाळावे. यामुळे किडनीवर अधिक दबाव येऊ शकतो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आधीच किडनी संबंधित समस्या असेल, तर चुकूनही लिंबू पाणी पिऊ नका.
छातीत जळजळ होणे जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही चुकूनही लिंबू पाणी पिऊ नका. असे केल्याने पेप्सिन नावाचे एन्झाइम सक्रिय होऊ शकते. यामुळे पेप्टिक अल्सरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लिंबू पाण्याचे सेवन करावे.