Uttar Pradesh ATS : नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक

216

उत्तर प्रदेश एटीएसने (Uttar Pradesh ATS) भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये 2 पाकिस्तानी आणि 1 काश्मिरी दहशतवादी असून, ते तिघही हिजबुल मुजाहिदीन आणि ISI शी संबंधित आहेत.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदारांची काय आहे ‘मन की बात’? केंद्राच्या कामावर नाखुश; पण…)

हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतले

एटीएसला (Uttar Pradesh ATS) काही दिवसांपूर्वीच या घुसखोरीची गुप्त माहिती मिळाली होती. या तिघांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणही घेतले असून, भारतात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. काही दिवसांपूर्वीच युपी एटीएसला ही माहिती मिळाली होती. दोन पाकिस्तानी व्यक्ती नेपाळमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गोरखपूर युनिटला देण्यात आली. यानंतर 3 एप्रिल रोजी एटीएसच्या (Uttar Pradesh ATS) गोरखपूर युनिटने नेपाळ भारत बॉर्डवरुन तीन आरोपींना अटक केली. मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अल्ताफ भट हा रावळपिंडी, पाकिस्तानचा रहिवासी आहे, सय्यद गझनफर हा इस्लामाबाद, पाकिस्तानचा रहिवासी आहे, तर नासिर अली हा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरचा रहिवासी आहे. तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर एटीएसने (Uttar Pradesh ATS) त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 मोबाईल फोन, 2 मेमरी कार्ड, 3 पासपोर्ट, 7 डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 3 आधार कार्ड, 2 विमान तिकिटे, पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स, पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र, परदेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले. नेपाळ, बांगलादेश, भारत आणि अमेरिकेचे चलन जप्त करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.