Lok Sabha Election 2024: देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

144
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती

२६ एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (५ एप्रिल) संपली. या टप्प्यात देशातील १३ राज्यांमधील ८९ मतदारसंघांमध्ये (Lok Sabha Election 2024) मतदान होणार आहे.

या टप्प्यात केरळमधील सर्वच २० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील २८ पैकी १४, राजस्थानमधील २५ पैकी १८ मतदारसंघांचा आणि महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढवीत असलेल्या वायनाड या मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे. त्यांच्याविरोधात भाकपच्या अॅनी राजा तर भाजपाचे केरळचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन रिंगणात आहेत.

(हेही वाचा – Crime News: मालवणीत मिळत होते २ हजारात बोगस आधार, वोटर कार्ड; एकाला अटक )

याशिवाय तिरुअनंतरपुरम येथून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या लढत होणार आहे. अटिंगलमधून केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन लढत देत आहे तर अलापुझा मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल नशीब अजमावित आहेत. राजस्थानमधील बिकानेरमधून अर्जुन राम मेघवाल मैदानात आहेत.

‘या’ मतदारसंघात शिंदे-ठाकरे गटांत लढत… 
महाराष्ट्रातील नांदेडच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या टप्प्यातील बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, परभणी या मतदारसंघांमध्ये ठाकरे व शिंदे गटांत थेट लढत होत आहे. वांशिक हिंसाचारामुळे प्रसिद्धीस आलेल्या ‘मणिपूर आऊटर’ या मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.