Indian Army: युद्धसज्जता, संरक्षण सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय लष्कर आखतेय नवीन योजना; लष्कर अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

208
Modi 3.0 : अग्निवीर योजना खरंच रद्द झाली तर संरक्षण खर्चावर काय परिणाम होणार?

भविष्यात (Indian Army) येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता आणि संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराकडे असलेली साधनसामग्री, मनुष्यबळ, आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्धसामर्थ्य वाढविण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलत आहे.

लष्कराला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत भारत आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असण्याबरोबरच संरक्षणविषयक अन्य सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती यादरम्यान झालेल्या बैठकीत देण्यात आली.

(हेही वाचा – Sanjay raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का बसणार नाही; राऊतांचं भाकित )

लष्कराने दिले चोख उत्तर…
– देशाच्या सीमांचे रक्षण व दहशतवादाचा मुकाबला लष्कराने समर्थपणे केला आहे. देशातील ज्या यंत्रणांवर जनतेचा गाढ विश्वास आहे, त्यामध्ये लष्कराचा समावेश होतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत म्हणाले. या बैठकीत सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचीही भाषणे यावेळी झाली. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी निधी  उभारण्याकरिता काय पर्याय अंमलात आणता येतील याचा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला.

लष्करावर गाढ विश्वास
सीमाभागात पायाभूत सुविधांचा होणारा विकास तसेच या भागात संरक्षणदृष्ट्या उचलण्यात आलेली पावले यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दर २ वर्षांनी अशी बैठक आयोजित करण्यात येते. यंदाची बैठक मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.