लोकसभा निवडणुका (lok sabha election 2024) तोंडावर असताना मुंबईत काँग्रेससमोर आव्हानात्मक परिस्थिती असल्याचे समजते आहे. मुंबई काँग्रेसमधील (Congress) काही नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) व माजी आमदार बाबा सिद्दीकीही (Baba Siddiqui) पक्षातून बाहेर पडले आहेत, तर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना पक्षातून काढून टाकण्यात आले असले, तरी त्यांनी स्वत: पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या (Congress) केंद्रीय नेतृत्वार निशाणा साधला आहे. (Congress lok sabha election)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली)
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची निवडणूक लढविण्याची इच्छा होती; परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ उबाठा गटाला सोडण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसवर (Congress)जाहीरपणे टीका करायला सुरुवात केली. निरुपम (Sanjay Nirupam) यांचा प्रदेश काँग्रेसच्या (Congress) स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाने समावेश केला होता; परंतु त्यांनी पक्षावरच टीका करायला सुरुवात केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगत, पक्षाच्या नेतृत्वावर व विचारसरणीवर टीका केली आहे. (Congress lok sabha election)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली)
वर्षा गायकवाड म्हणाल्या,
मुंबई काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यासारखे लोक पक्षातून गेले, तरी काही फरक पडत नाही. काँग्रेस पक्ष लढेल आणि जिंकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (Congress lok sabha election)
हे पहा –
Join Our WhatsApp Community