Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली

199
Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली
Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली

मार्च महिन्याच्या शेवटी पावसाने (Heatwave)काही राज्यांत हजेरी लावली होती. परिणामी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस उन्हाचा पारा वाढत असुन विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेला आहे. कमाल आणि किमान तापमानात (Heatwave)वाढ होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगाव पर्यंत करण्यात आली आहे. एकिकडे उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मितीसुद्धा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही भागांमध्ये एप्रिल ते जुनमध्ये प्रचंड उष्णतेचा इशारा दिला आहे. (Heatwave)

(हेही वाचा – Himachal Pradesh Earthquake: हिमाचल प्रदेश भूकंपाने हादरले, ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप)

या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयही सतर्क झालं आहे. उन्हामुळे (Heatwave) उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी, आजार आणि उष्माघात यांसारख्या बाबींपासून नागरिकांनी स्वत:ला दूर ठेवावे, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री, डॉ. मनसुख मांडाविया (Dr. Mansukh Mandavia) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत, उष्णतेशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी आणि सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी मुख्य धोरणांवर चर्चा करण्यात आली. (Heatwave)

(हेही वाचा – IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant : शाहरुख खानलाही घातली रिषभ पंतच्या ‘नो लूक’ फटक्याने भुरळ )

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विट करत म्हटले आहे की, उष्णतेची लाट आलीच तर त्यासाठी तोंड देण्यासाठी सज्जतेच्या पातळीचे मूल्यांकन करणे आणि आगामी उन्हाळी हंगामासाठी धोरणे तयार करणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दीष्ट होते. (Heatwave)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.