- ऋजुता लुकतुके
आयपीएल ही मूळातच षटकार आणि चौकारांची लीग आहे. त्या बाबतीत यंदाचा हंगाम हा धमाकेदार ठरला आहे. फक्त १७ सामने झाले आहेत. आताच हंगामातील ३०० षटकार पूर्ण झाले आहेत. पहिल्या दोनच आठवड्यात ३०० षटकार पहिल्यांदाच पहायला मिळाले आहेत. यापूर्वी १७ सामन्यांत सगळ्यात जास्त २५९ षटकार ठोकले गेले होते. (IPL 2024, Sixes Galore)
(हेही वाचा- IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant : शाहरुख खानलाही घातली रिषभ पंतच्या ‘नो लूक’ फटक्याने भुरळ )
गेल्याच हंगामात २०२३ मध्ये पहिल्या दोन आठवड्यात २५९ षटकार पहायला मिळाले होते. विशेष म्हणजे या हंगामात आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वोच्च धावसंख्या रचल्या गेल्या आहेत. सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध ३ बाद २७७ धावांचा डोंगर रचला. या सामन्यानंतर काहीच दिवसांत कोलकाता संघानेही दिल्ली विरुद्ध (Delhi Capitals) ७ बाद २७२ धावा केल्या. शिवाय २० षटकांत २०० धावा होण्याची वेळही तब्बल ५ वेळा आली. त्यामुळे अर्थातच, षटकारांची आतषबाजी आतापर्यंत बघायला मिळाली आहे. (IPL 2024, Sixes Galore)
सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) ३ बाद २७७ धावा केल्या. तेव्हा मुंबईनेही (Mumbai Indians) ५ बाद २४६ धावांचं प्रत्युत्तर हैद्राबादला दिलं. याच सामन्यात एका सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा म्हणजे ३८ षटकारांचा विक्रम घडून आला. तर कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यातही २९ षटकार चढवले गेले. (IPL 2024, Sixes Galore)
(हेही वाचा- Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…)
अर्थातच, यावेळी षटकारांची संख्या जास्त आहे. आतापर्यंतच्या सर्व हंगामात पहिल्या १७ सामन्यांत आतापर्यंत सर्वाधिक किती षटकार खेचले गेले आहेत ते पाहूया, (IPL 2024, Sixes Galore)
२०२४ – ३०० (चेंडू १२.५)
२०२३ – २५९ (१५.३)
२०२० – २५८ (१५.६)
२०१८ – २४५ (१५.८)
२०२२ – २४५ (१६.१)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community