IPL 2024, Chennai’s Love For Biryani : चेन्नई सुपरकिंग्ज खेळाडूंनी हैद्राबादमध्ये बिर्याणीवर असा मारला ताव 

IPL 2024, Chennai’s Love For Biryani : चेन्नईच्या खेळाडूंना बिर्याणीसाठी एकत्र आणलं ते माजी खेळाडू अंबाती रायडूने

342
IPL 2024, Chennai’s Love For Biryani : चेन्नई सुपरकिंग्ज खेळाडूंनी हैद्राबादमध्ये बिर्याणीवर असा मारला ताव 
IPL 2024, Chennai’s Love For Biryani : चेन्नई सुपरकिंग्ज खेळाडूंनी हैद्राबादमध्ये बिर्याणीवर असा मारला ताव 
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) खेळाडू सामन्यासाठी हैद्राबादला (Sunrisers Hyderabad) येतात तेव्हा बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी सरावातूनही वेळ राखून ठेवतात. या वेळेला ते ‘बिर्याणी टाईम’ असं म्हणतात. यावेळी हैद्राबादमध्ये बिर्याणीचा पहिला आस्वाद घेताना संघाबरोबर होता माजी खेळाडू अंबाती रायडू. रायडूला कौतुकाने चेन्नई संघात एटीआर म्हटलं जातं. चेन्नई फ्रँचाईजीकडून खेळला असला तरी तो मूळचा हैद्राबादचा आहे. त्यामुळे शुक्रवारच्या सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईचा संघ हैद्राबादमध्ये आल्यावर रायडूने आपल्या घरीच खेळाडूंसाठी बिर्याणीचा बेत केला होता. (IPL 2024, Chennai’s Love For Biryani)

(हेही वाचा- Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…)

गेल्या हंगामात चेन्नई संघाने आपलं पाचवं लीग विजेतेपद पटकावलं. त्यानंतर अंबाती रायडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रायडू हैद्राबादमध्येच राहत आहे. (IPL 2024, Chennai’s Love For Biryani)

(हेही वाचा- IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant : शाहरुख खानलाही घातली रिषभ पंतच्या ‘नो लूक’ फटक्याने भुरळ )

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) अधिकृत ट्विटर हँडलवर अंबाती रायडूच्या (Ambati Rayudu) घरी झालेल्या या पार्टीचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याचा मथळा आहे, ‘आमचं कुटुंब. भावनांचा मिलाफ.’ त्यानंतर फ्रँचाईजीने अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शिवम दुबे आणि मुकेश चौधरी यांचा एकत्र फोटोही शेअर केला आहे. ‘एटीआरच्या शहरात असाल तर बिर्याणी मेजवानी अनिवार्य आहे,’ असा मथळा या फोटोला देण्यात आला आहे. (IPL 2024, Chennai’s Love For Biryani)

(हेही वाचा- Jammu Kashmir Infiltration: उरीमध्ये घुसखोरीचा ठाव सुरक्षा जवानांनी उधळला, एक दहशतवादी ठार)

चेन्नई संघ या हंगामात आतापर्यंत ३ सामने खेळला आहे. यातील २ सामने संघाने जिंकले आहेत. तर एक गमावला आहे. शुक्रवारी संघ सनरायझर्स हैद्राबादशी (Sunrisers Hyderabad) दोन हात करणार आहे. (IPL 2024, Chennai’s Love For Biryani)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.