P V Sindhu : उबेर चषकातून पी व्ही सिंधूची माघार

P V Sindhu : दुखापतीतून सावरल्यानंतर निवडक स्पर्धांमध्ये खेळण्याचं सिंधूने ठरवलंय. 

158
P V Sindhu : उबेर चषकातून पी व्ही सिंधूची माघार
  • ऋजुता लुकतुके

दोनवेळा ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने (P V Sindhu) महिलांची सांघिक स्पर्धा उबेर चषकातून माघार घ्यायचं ठरवलं आहे. तिच्या बरोबरच त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच अश्विनी पोनाप्पा आणि तनिशा कॅस्ट्रो या महिला दुहेरीतील आघाडीच्या जोड्याही खेळणार नाहीएत. पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. २७ एप्रिलला चेंगडूमध्ये थॉमस आणि उबेर चषक स्पर्धा सुरू होणार आहे. (P V Sindhu)

३ महिन्यांच्या विश्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात आशियाई विजेतेपद स्पर्धेत सिंधूने बॅढमिंटन कोर्टवर पुनरागमन केलं. तेव्हापासून ती ६ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. पण, आता पॅरिस ऑलिम्पिक जवळ आल्यामुळे सिंधूने निवडक स्पर्धा खेळण्यांचं ठरवलं आहे. दुखापतीनंतर अचानक तिला स्पर्धांची संख्या आणि सरावाचा वेळ वाढवायचा नाही. (P V Sindhu)

(हेही वाचा – Jammu Kashmir Infiltration: उरीमध्ये घुसखोरीचा डाव सुरक्षा जवानांनी उधळला, एक दहशतवादी ठार)

महिला दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या दोन जोड्या म्हणजे त्रिसा-गायत्री आणि अश्विनी-तनिषा या आहेत. पण, दोघींनी अजून ऑलिम्पिक पात्रता गाठलेली नाही. त्यामुळे सुपर सीरिज खेळून क्रमवारीतील स्थान सुधारण्यावर या जोड्यांचा भर असेल. प्रमुख महिला खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूंना संघात संधी दिली आहे. (P V Sindhu)

महिलांनी नुकतीच आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे उबेर चषकांत संघाकडून नक्कीच आशा आहेत. तर पुरुषांमध्ये थॉमस चषकात भारतीय संघ (Indian team) गतविजेता आहे. आणि यंदाही त्यांच्याकडून कामगिरीत सातत्याची अपेक्षा आहे. कारण, या स्पर्धेत भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरत आहे. (P V Sindhu)

(हेही वाचा – IPL 2024, Rishabh Pant : रिषभ पंतला २४ लाखांचा दंड का झाला?)

भारताच्या पुरुष आणि महिलांचे संघ पुढील प्रमाणे आहेत.

उबेर चषकासाठी महिलांचा संघ – अनमोल खर्ब, तन्वी शर्मा, अश्मिता चलिहा, इशाराणी बारुआ, श्रुती मिश्रा, प्रिया कोनजेंगबाम, सिमरन सिंघी व रितिका ठाकर. (P V Sindhu)

थॉमस चषकासाठी पुरुषांचा संघ – एच एस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, प्रियांशू राजावत, किरण जॉर्ज, चिराग शेट्टी, सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी, ध्रुव कपिला, एम आर अर्जुन व साई प्रतीक. (P V Sindhu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.