- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC Highlights) तिमाही पतधोरणाच्या बैठकीत रेपो व्याजदर जैसे थे ठेवण्याचा अपेक्षित निर्णय घेण्यात आला. सलग सातव्यांदा मध्यवर्ती बँकेनं (central bank) कर्जावरील व्याजदर कायम ठेवले आहेत. मे २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंत रेपो दरात २५० अंशांची वाढ केल्यानंतर मागच्या ११ महिन्यात रिझर्व्ह बँकेनं हे व्याजदर कायम ठेवले आहेत. पण, त्याचवेळी अन्नधान्याच्या किमतीवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. (RBI MPC Highlights)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी चंद्रपुरात सभा)
सध्या रेपो दर हा ६.५ टक्क्यांवर कायम आहे. पतधोरणाच्या बैठकीत देशाचा विकासदर आणि महागाई या महत्त्वाच्या गोष्टींवरही मध्यवर्ती बँक (central bank) भाष्य करत असते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंचा महागाई दर ४.५ टक्के इतका असेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. महागाई दर २ ते ५ टक्क्यांच्या मध्ये राखणं हे रिझर्व्ह बँकेचं लक्ष्य आहे. (RBI MPC Highlights)
त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकासदर हा आर्थिक वर्ष (financial year) २०२५ मध्ये ७ टक्के इतका राहील असाही रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण मांडताना भारतीय अर्थव्यवस्थेविषयी (Indian Economy) कोणते मुद्दे अधोरेखित केले त्यावर एक नजर टाकूया, (RBI MPC Highlights)
(हेही वाचा- IPL 2024, Rishabh Pant : रिषभ पंतला २४ लाखांचा दंड का झाला?)
-
नवीन आर्थिक वर्षात महागाई दर ४ टक्के इतका ठेवण्याचं रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्टं आहे
-
देशाचं जीडीपी आणि जागतिक कर्ज यांचं गुणोत्तर वाढलेलं असल्याचं निरीक्षण रिझर्व्ह बँकेनं नोंदवलं आहे
-
येणाऱ्या काळात रिझर्व्ह बँकेला रेपो दर कमी करायचा आहे
-
नवीन आर्थिक आर्थिक वर्षात ग्रामीण भागातून वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आहे
-
महागाईचा बडगा कमी व्हावा यासाठी उत्पादनात शाश्वत वाढ, सेवा क्षेत्रात खाजगी गुंतवणूक यांना प्राधान्य द्यायला हवं
-
आर्थिक वर्ष २५ साठी जीडीपी विकासदर ७ टक्के राहण्याची शक्यता
-
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ काळजी वाढवणारी
-
आंतरराष्ट्रीय भू-राजकीय संकटांमुळे वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
-
इतर जागतिक चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी स्थिर
-
अन्न-धान्याच्या किमती वाढण्याची भीती असल्यामुळे महागाईचं संकट कायम
-
महागाईला गव्हर्नर दास यांनी ‘खोलीतील हत्ती’ असं म्हटलं आहे. हत्तीने जंगलातच राहावं, नागरी वस्तीत येऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचं दास यांनी म्हटलं आहे
-
महागाई दर ४.५ टक्के राहण्याची शक्यता
-
महागाई दरावरील नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेचं धोरण लवचिकच राहणार
-
किमती आटोक्यात ठेवण्याचं धोरण दीर्घकाळ राबवणार
-
परकीय चलन गंगाजळीत पुरेसा साठा ठेवणं हे बँकेच लक्ष्य
-
भारतीय अर्थव्यवस्था सध्या ‘काम सुरू आहे’ या वळणावर
-
सोवरिन बाँड योजनेतील खरेदी विक्री इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटरवर उपलब्ध करणार
-
युपीआयच्या माध्यमातून रोख ठेवी स्वीकारण्यास परवानगी देणार
-
स्मॉल फायनान्स बँकांना वायद्याने व्याजदर ठरवण्याची मुभा
-
रिझर्व्ह बँकेचा १०० वर्षांचा प्रवास आव्हानात्मक वळणावर
हेही पहा-
Join Our WhatsApp Community