पुणे येथील सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांची कन्या देवश्री साने हिने चित्र रेखाटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा अभ्यास करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन वैचारिक चळवळींचे प्रतिबिंब त्यातील चित्रातून दिसत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि म. गांधी यांच्या विचारांतील फरक त्या चित्रातून स्पष्ट दिसत आहे. (Veer Savarkar)
या चित्राविषयी बोलतांना चंद्रशेखर साने म्हणाले की, म. गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोघेही स्वातंत्र्याच्या मार्गावर असले, तरी त्यांचे दृष्टीकोन वेगळे आहेत. म. गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ‘जेल भरो’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दृष्टीकोन मात्र वेगळा होता. देश पारतंत्र्यात आहे; म्हणजे आपण आधीच कैदेतच आहोत. तर अजून कारागृहात जाऊन काय करणार ? तुरुंग म्हणजे निष्क्रीयता आहे. एकदा शस्त्राचे प्रशिक्षण घेतले की, नळी कुठे वळवायची, ते ठरवता येते, असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार होता. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community