Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जावयाने बांधले गुडघ्याला बाशिंग

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे जावई अर्थात प्रियांका गांधी यांचे पती यांनी रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणूक लढविणेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे कळतेय.

195
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जावयाने बांधले गुडघ्याला बाशिंग
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जावयाने बांधले गुडघ्याला बाशिंग

काँग्रेसचे (Congress) पारंपरिक  मतदार संघ म्हणून रायबरेली (raybereli) आणि अमेठी (amethi) या उत्तर प्रदेशातील दोन मतदार संघा कडे पहिले जाते. मात्र गांधी कुटुंबाला 2019 मध्ये यातील एकच मतदार संघ राखता आला. तर अमेठीमध्ये 2019 ला भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अगदी वायनाड ने राहुल गांधी ला विजय मिळवून दिला म्हणून नाही तर अवघडच होते. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचा जाहीरनामा; ५ न्याय, २५ गॅरेंटीचे न्यायपत्र जाहीर)

तर आता काँग्रेसचे (Congress) जावई अर्थात प्रियांका गांधी यांचे पती यांनी रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024 ) लढविणेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे कळतेय. स्वतः रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी अमेठी मधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर उत्तर प्रदेशातील रायबरेली (raybereli) आणि अमेठी (amethi) मधून काँग्रेसचा (Congress) उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच वाड्रा च्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. (Lok Sabha Election 2024 )

या दोन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अद्याप दोन्ही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही, तर  प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा असताना रॉबर्ट वाड्रा यांनी मोठे संकेत दिले आहेत.अमेठीमध्ये 2019 मध्ये भाजपच्या  नेत्या आणि विद्यमान खासदार स्मृती इराणींनी राहुल गांधींचा  पराभव केला होता, तर रायबरेलीमध्ये विजयी मिळवलेल्या सोनिया गांधी या वेळी निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे काँग्रेससमोर  उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न आहे. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा- Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली)

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना सोनिया गांधीचे जावई आणि प्रियांका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी सूचक संकेत दिले आहेत. आपण अमेठीतून (amethi) निवडणूक लढवावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे विधान वाड्रा यांनी केले आहे.ते म्हणाले की , अमेठीतून लोकांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी करावे असे अपेक्षित आहे. गांधी कुटुंब मागील अनेक वर्षांपासून अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूरमध्ये मेहनत घेत आहे. सध्याच्या खासदारांमुळे अमेठीतील लोक अडचणीत आले आहेत. विद्यमान खासदारांना निवडून देत चूक केल्याचे त्यांना वाटत आहे, अशी टीकाही वाड्रा यांनी इराणींवर केली. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा- RBI MPC Highlights : रेपो रेट जैसे थे, नवीन आर्थिक वर्षात विकासदर ७ टक्क्यांवर राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज )

दरम्यान, राहुल गांधी हे 2002 पासून अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. मागील निवडणुकीत काँग्रेसला (Congress) उत्तर प्रदेशात केवळ रायबरेली या मतदारसंघात विजय मिळाला होता. आता हा मतदारसंघही या वेळी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपने दोन्ही मतदारसंघांत ताकद लावली असल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा लांबत चालल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Election 2024 )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.