स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) म्हटले की, आठवते ती प्रखर देशभक्ती. काळ्या पाण्याची त्यांना झालेली शिक्षा आणि त्यावेळी त्यांनी सहन केलेल्या यातना. साहित्यिक, कवी, लेखक, नाटककार, इतिहासकार, समाजसुधारक… एका महान राष्ट्रभक्ताची विविध रूपे प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते, रणदीप हुड्डा (Randeep hooda) दिग्दर्शित आणि अभिनीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचे. या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन माहीम येथील सिटीलाईट सिनेमागृहात (Citylight Cinema) गुरुवारी करण्यात आले होते.
देशाच्या एका महान सुपुत्राच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी (९ ते १२) आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शोलाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. (Swatantrya Veer Savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीकार्यातील महत्त्वाच्या घटना, उदा. सशस्त्र क्रांतीचा सखोल अभ्यास, लंडनमध्ये जाऊन सावरकरांनी केलेला अभ्यास, इंडिया हाऊसमध्ये केलेले कार्य, मार्सेलिस बेटावर समुद्रात बोटीतून घेतलेली उडी, अभिनव भारतासाठी दिलेले बलीदान, गांधी विरुद्ध सावरकर वैचारिक युद्ध, अंदमानात भोगावी लागलेली काळ्या पाण्याची शिक्षा… या घटनांचा खरा इतिहास तरुण पिढीसमोर येणं गरजेचं आहे. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, मध्यमवर्गीय, अशा प्रत्येक वयोगटातील रसिक प्रेक्षकांना यातील प्रसंग खिळवून ठेवतात, ब्रिटिश सरकारने केलेल्या अनन्वित छळ या चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, प्रसंगी भावुकही करतात तसेच काही प्रसंगांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली. प्रत्येकात देशभक्ती रुजवायला मदत करणाऱ्या या चित्रपटाला विद्यार्थी, विविध वयोगटातील स्त्री-पुरुष, तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे दाद दिली.
(हेही वाचा – Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली)
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शोवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, दादर सांस्कृतिक मंचाचे कलाकार आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community