शिखा ओबेरॉय (Shikha Oberoi) ही भारतीय वंशाची अमेरिकन टेनिस खेळाडू (American tennis player) आहे. सुरुवातीला तिने अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस टुर्नामेंट्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिखा ओबेरॉयचा जन्म ५ एप्रिल १९८३ साली महाराष्ट्रात झाला. तिच्या वडिलांचं नाव महेश ओबेरॉय असं आहे. ते टेबल टेनिस खेळायचे. तिच्या आईचं नाव मधू ओबेरॉय असं आहे.
शिखाच्या लहानपणीच तिचं कुटुंब भारत सोडून न्यू जर्सी येथे राहायला गेलं. तिला चार बहिणी आहेत. एक मोठी आणि तीन तिच्यापेक्षा लहान आहेत. या सगळ्या बहिणी टेनिसपटू आहेत. शिखा ओबेरॉय ही भारतीय वंशाची पहिली टेनिसपटू आहे जी अमेरिकेचं प्रतिनिधित्व करते. शिखा ही अभिनेता विवेक ओबेरॉयची चुलत बहीण आहे.
(हेही वाचा – NCERT: हिंदुत्व, गुजरात दंगल आणि अल्पसंख्याक…’हे’ संदर्भ एनसीईआरटी पुस्तकातून काढले; कारण जाणून घ्या…)
शिखा ओबेरॉय हिने प्रिंटसन युनिव्हर्सिटी येथून एंथ्रोपोलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीज (South Asian Studies) या विषयांत ग्रॅज्युएशन केलं आहे. एवढंच नव्हे तर तिने तिच्या शैक्षणिक कालावधीत लीडरशिप आणि नैतिकतेसाठी प्रिंटसन युनिव्हर्सिटीचा सर्वात प्रतिष्ठित अॅवॉर्डही मिळवला आहे. किट हॅरीज मेमोरियल अवॉर्ड असं त्या अॅवॉर्डचं नाव आहे.
टेनिस आणि फिटनेस कोच
शिखा ओबेरॉय हिने स्वतःची मीडिया आणि लाईफस्टाईल कंपनीही सुरू केली आहे. तिने वर्तमान परिस्थितीवर आधारित आंतरराष्ट्रीय असलेल्या सामाजिक मुद्द्यांचा विषय घेऊन टेलिव्हिजन शोची निर्मिती केलेली आहे. याव्यतिरिक्त ती अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजनैतिक कार्यक्रमांतून खेळाद्वारे महिला सशक्तीकरण या विषयावर व्याख्याने देते. हल्लीच तिला भोपाळ येथील विश्व आर्थिक मंडळाच्या ग्लोबल शेपर्स इनिशिएटिव्हच्या मार्गदर्शक समितीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. शिखा ओबेरॉय ही एक टेनिस आणि फिटनेसची कोचदेखील आहे.
हेही पहा –