Sassoon Hospital : ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट

163
Sassoon Hospital : ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट

पुण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये आयसीयूतील एका रुग्णाला उंदरानं चावा घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर ससून रुग्णालय (Sassoon Hospital) प्रशासनाला अशा घटनांप्रती गांभीर्यानं पावलं उचलावीत यासाठी पुण्यातील वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी अनोखी शक्कल लढवत थेट ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे. या भेटीबाबत मोरे यांनी सोशल मीडियावरुन यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sassoon Hospital)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद)

यापेक्षाही मोठाले पिंजरे आणण्याचा इशारा

त्यांनी म्हटलं की, काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) बातमी आली अपघातानं जखमी झालेल्या तरुणाचा ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात अॅडमिट असताना उंदरानं चावा घेतल्यामुळं मृत्यू झाला. (Sassoon Hospital)

म्हणून ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे आम्ही भेट दिले. जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं देण्यात आला. (Sassoon Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.