Heatstroke : उष्माघात बाधित रूग्णांसाठी प्रमुख रूग्णालयांमध्ये रुग्ण कक्ष कुल कुल

मुंबईतील १०३ आपला दवाखान्यांमध्ये वातानुकूलन सुविधा

208
Heatstroke : उष्माघात बाधित रूग्णांसाठी प्रमुख रूग्णालयांमध्ये रुग्ण कक्ष कुल कुल

मुंबई महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांत उष्माघात (Heatstroke) बाधित रूग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या १४ रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी शीत कक्ष (Cold Room) रूग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीला मुंबई महानगरातील १०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्येही वातानुकूलन (एअर कंडिशनर) व्यवस्था करण्यात आली आहे. (Heatstroke)

थंड हवेची खोली (कोल्ड रूम) आणि रूग्णशय्याची व्यवस्था

मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उष्माघात (Heatstroke) बाधित व्यक्ती आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या १४ रुग्णालयात उष्माघात रुग्णाकरीता थंड हवेची व्यवस्था/शीत कक्ष (Cold Room) असलेली दोन रूग्णशय्यांची व्यवस्था तसेच आवश्यक औषधांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. उर्वरित रुग्णालयात वातानुकूलन एअर कंडिशनर (Air Conditioner)/कूलरची व्यवस्था करण्यात येत आहे. (Heatstroke)

(हेही वाचा – Congress : अमेठीत काँग्रेसला उमेदवार सापडेना; गांधी घराण्याची अगतिकता)

अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण

महानगरपालिकेच्या १०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात वातानुकूलन (Air Conditioner) ची व्यवस्था उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आणि दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. उष्माघातावरच्या (Heatstroke) उपाययोजनांवर मार्गदर्शन, उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Heatstroke)

येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील प्रमुख तसेच सर्वसाधारण आणि वैद्यकीय रूग्णालयात मार्गदर्शन व उपचाराची सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. (Heatstroke)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.