मुंबईत उन्हाळी ऋतू तसेच तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे (Heatstroke) प्रकार होण्याची दाट शक्यता असून असा प्रकार होऊ नये यासाठी, मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचनांबाबत रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Heatstroke)
उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान तुलनेने अधिक असते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्माघात (Heat Stroke) होण्याची शक्यता असते. उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करत विविध माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. उष्माघाताचा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी या उपाययोजना व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Heatstroke)
उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी अशी घ्यावी काळजी
उष्माघात संबंधित आजाराची लक्षणे
प्रौढांमध्ये
शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. (Heatstroke)
लहान मुलांमध्ये
आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे. (Heatstroke)
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ‘हे करा’
- डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात रहावे, बाहेरील कामे सकाळी १० वाजेच्या आत अथवा सायंकाळी ४ नंतर करावीत.
- पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश/उन्हाला टाळावे.
- पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या. (Heatstroke)
(हेही वाचा – CBSE : सीबीएसईकडून अकरावी व बारावीच्या परीक्षेत बदल)
‘हे करू नका’
- उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर शक्यतो जाऊ नये.
- उन्हात चप्पल न घालता/अनवाणी चालू नये.
- लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून वाहन बंद करू नये.
- चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत.
- भर दुपारी गॅस किंवा स्टोव्ह समोर स्वयंपाक करणे टाळा. (Heatstroke)
उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास करावयाचे प्रथमोपचार
- पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
- त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात/सावलीत आणावे.
- मूल जागे असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत.
- हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.
- थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा.
- कपडे घट्ट असल्यास सैल करावेत.
- उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
- उष्माघातासारखे वाटल्यास महानगरपालिकेच्या अथवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा कौटुंबिक वैद्यकीय तज्ज्ञांचा (फॅमिली डॉक्टर) सल्ला घ्यावा. (Heatstroke)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community