Rahul Gandhi : पॉस्कोअंतर्गत गुन्हा, सावरकरांवर टीका; ही आहे राहुल गांधींवरील गुन्ह्यांची जंत्री

Rahul Gandhi : नुकतेच राहुल यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासह त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल यांच्यावरील गुन्ह्यांचीही माहिती उघड झाली आहे. काँग्रेसचे (Congress) पहिल्या फळीतील नेते असलेले राहुल गांधी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

247
Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे बीआरएसने केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे बीआरएसने केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवार, ३ एप्रिल रोजी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून अनेक खुलासे झाले आहेत.

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला की, उमेदवाराची संपत्ती आणि त्याच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती उघड होत असते. नुकतेच राहुल यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासह त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल यांच्यावरील गुन्ह्यांचीही माहिती उघड झाली आहे. काँग्रेसचे (Congress) पहिल्या फळीतील नेते असलेले राहुल गांधी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्याविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणीही राहुल गांधींवर अब्रुनुकसानीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासह इतरही 18 गुन्हे दाखल आहेत.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका)

बलात्कार पीडितेची उघड केली ओळख

९.९.२०२१ रोजी राहुल गांधी यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांशी चर्चा केली. याविषयी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बलात्कार पीडितेची ओळख उघड झाली. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात Protection of Children from Sexual Offenses Act अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

वीर सावरकरांच्या मानहानीप्रकरणी तक्रार

थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वंदना डोंगरे यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये ठाणे पोलिसांकडे राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत राज्यातील हिंगोली जिल्ह्यात भारत जोड़ो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदारांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. त्या वेळी राहुल गांधी यांनी म्हटले होते की, वीर सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका दिली होती की, “इंग्रजांनी त्यांना माफ करावे. त्यानंतर ते इंग्रजांना मदत करतील. सावरकर इंग्रजांकडून निवृत्तीवेतन घेत असत आणि देशाच्या हिताच्या विरोधात काम करत असत.” भारतीय दंड संहितेचे कलम 500 (मानहानी) आणि 501 (बदनामीकारक असल्याचे माहित असूनही जाणीवपूर्वक विषय उकरून काढणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रा.स्व. संघाची केली होती मानहानी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) भिवंडी येथील पदाधिकारी राजेश कुंटे यांनी 2014 मध्ये राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी भिवंडी येथे केलेल्या भाषणात महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल

राहुल गांधी यांनी झारखंडमधील गडा येथे 2019 च्या निवडणुकीच्या सभेत ‘रेप इन इंडिया’ असे विधान केले होते. या विधानाने भावना दुखावल्याच्या प्रकरणी 2019 मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने दंडाधिकारी न्यायालयात राजद्रोहाची तक्रार दाखल केली. न्यायालयाने तक्रार स्वीकारली आणि आमदार आणि खासदारांविरुद्धच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी ती भोपाळच्या विशेष न्यायालयात पाठवली. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आयपीसीच्या कलम 124-ए, 281,153-ए, 153-बी, 59,506,268,295,503,504 अंतर्गत खटला स्वीकारण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारदार मुकेश राजावत नी मुख्य न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी गौरव गर्ग यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

या प्रमुख प्रकरणांसह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर बदनामीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.