आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक न केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या ९ हजार कर्मचाऱ्यांसह सुमारे १६ हजार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार हा अवघा एक रुपये एवढाच आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड हे पॅन कार्डशी जोडणे हे आवश्यक होते, परंतु महापालिकेच्या (BMC) यासर्व कामगार, कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यामुळे या महिन्यांत वेतनाची तसेच सेवा निवृत्तीची रक्कम पूर्णपणे कापून घेतानाच एक रुपया एवढीच रक्कम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे तब्बल ०९ हजार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि १६ हजार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार केवळ एक रुपया एवढाच मिळालेला आहे. (BMC)
केंद्र शासनाने आदेश जारी करत ३० जून २०२३पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड कार्डला लिंक करावे अशाप्रकारच्या सूचना जनतेला केल्या होत्या. त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक न करणाऱ्यांना १०० टक्के दंड आकारण्याच्या सूचना होत्या. परंतु मुंबई महापालिकेने (BMC) यासंदर्भात आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करत ऑक्टोबर २०२३पर्यंत या आधार कार्ड पॅन कार्ड या एकमेकांशी जोडण्याबाबत परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना कल्पना दिल्यानंतरही तब्बल ९ हजार कार्यरत कर्मचारी आणि १६ हजार सेवा निवृत्त कर्मचारी यांनी आधार आणि पॅन कार्ड हे एकमेकांशी जोडलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पगारातून तसेच निवृत्ती वेतनातून २० टक्के दंडात्मक रक्कम वसूल केली जात होती. (BMC)
(हेही वाचा – Shivaji Park Metro Station : शिवाजी पार्क मेट्रो स्थानकाच्या भोवताली जाणून घ्या प्रेक्षणीय स्थळे)
परंतु मार्च अखेर पर्यंत ही प्रक्रिया न झाल्याने अखेर यासर्व कर्मचाऱ्यांना केवळ एक रुपया वेतनाची रक्कम देत उर्वरीत रक्कम कापून घेण्यात आली आहे. त्यामुळे यासर्व कर्मचाऱ्यांनी आधार व पॅन कार्ड लिंक केल्यास आयकर परताव्याची प्रक्रिया केल्यास ही सर्व रक्कम त्यांना परत मिळू शकेल. मात्र, जोवर ही लिंक करण्याची प्रक्रिया करत नाही तोवर सध्या दहा टक्क्यांऐवजी २० टक्के एवढीच रक्कम कापून घेतली जाणार आहे. मात्र हे दोन्ही कार्ड लिंक केल्यास त्यांचे मासिक वेतनातून दहा टक्के एवढीच रक्कम कापून घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community