देशभरात आता लोकसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत. त्यातच ठिकठिकाणी राज्यभरात उमेदवारी कोणाला जाणार यावरून देखील राजकारण रंगू लागले आहे. राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची अशी झालेली कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार आणि ती न मिळाल्यास मी स्वतः राजकारणातून संन्यास घेईल असे माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी बोलून दाखवले. (Lok Sabha Elections 2024)
राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघातील जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवार जाहीर झालेले असताना कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अजूनही उमेदवार जाहीर न झाल्याने शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांकडून शिवसेना शिंदे गटावर कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळेच प्रतिउत्तरा दाखल शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे माध्यमांसमोर आले असून त्यांनी माझे मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती चर्चा झाली असून कल्याण डोंबिवली लोकसभेत संदर्भात चर्चा झाली आहे व ही जागा शिवसेनेचे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच लढवतील असे स्पष्ट केले. जर असे झाले नाही तर मी स्वतः राजकारणातून संन्यास घेईल एवढा विश्वास देखील दाखवला. (Lok Sabha Elections 2024)
(हेही वाचा – Heatstroke टाळण्यासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; कशी घ्याल काळजी, वाचा…)
कल्याण डोंबिवली-लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पहावयास मिळाला होता. त्यामुळेच भाजपाकडून या जागेची उमेदवारी आपल्या पक्षाकडे मिळावी यासाठी रस्सीखेच देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. राज्यभरातील लोकसभेच्या अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवार जाहीर झाल्यानंतर देखील कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढवणार हे जाहीर न झाल्यामुळे विरोधक शिवसेना गटावरती कुरघोड्या करत होते. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community