जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) आणि राजस्थानात (Rajasthan) भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये शुक्रवारी (५ एप्रिल) रात्री ११.०१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची (Earthquake) तीव्रता ३.२ असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. किश्तवाडमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
(हेही वाचा – Ring Design for Women : आपल्या प्रिय सखीसाठी अंगठी कशी निवडाल ?)
राजस्थानमधील पाली येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप (Earthquake) झाला. मात्र भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
(हेही वाचा – आता रोव्हर अंतराळवीरांना चंद्राच्या कानाकोपऱ्यातून फिरवून आणणार; NASA करत आहे तयारी)
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंप (Earthquake) रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप १ ते ९ पर्यंत त्याच्या केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते. (Earthquake)
हे पहा –
Join Our WhatsApp Community