मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत (९ एप्रिल २०२४) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास इंजिन गरम होणे, वाहनांनी पेट घेणे किंवा ईव्ही बॅट्रीजचा स्फोट होणे अशा घटना घडत असल्याने महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. (Mumbai Pune Expressway)
(हेही वाचा – Earthquake: जम्मू काश्मीर आणि राजस्थानात जाणवले भूकंपाचे धक्के)
राज्यातील बहुतेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे. परंतु, वाढत्या उन्हामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय,इंजिन गरम होऊन वाहन पेट घेण्याची शक्यता असते. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. (Mumbai Pune Expressway)
(हेही वाचा –Lok Sabha Elections 2024 : श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर रामदास कदमांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…)
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना पुढील तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच येत्या ६ एप्रिलपासून ९ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. दरम्यान, अवजड वाहन मालक, चालक संघटनांनी पुढील तीन दिवस अवजड वाहने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Mumbai Pune Expressway)
हे पहा –
Join Our WhatsApp Community