अमेरिकेतील (us Austin) टेक्सास राज्यातील ऑस्टिन (us Austin) शहरात शिवजयंतीचा (Shiv Jayanti) उत्साह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात आली होती. महाराष्ट्रीयन पारंपरिक समृद्ध वारशाची जोपासना करण्यासाठी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र माझा’ (Maharashtra Maza) या स्वयंसेवी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी चोवीस अमेरिकन-भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला.
(हेही वाचा – Rahul Gandhi : पॉस्कोअंतर्गत गुन्हा, सावरकरांवर टीका; ही आहे राहुल गांधींवरील गुन्ह्यांची जंत्री)
या कार्यक्रमात १५० हून अधिक कलाकारांनी भाग घेतला होता. अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवरायांचा (Shiv Jayanti) भगवा कॅपिटॉल बिल्डिंगसमोर फडकला. यावेळी थ्री-डी तंत्रज्ञानाने शिवरायांचा पुतळा प्रिंट केला होता. (us Austin) शास्त्रीय आणि लोकनृत्येही या प्रसंगी झाली. बालकलाकारांचे ढोल-ताशा वादन लक्षवेधक ठरले. सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाने नावीन्यपूर्ण नृत्याने राज्याभिषेक सोहळा सादर केला. विंग स्कूल ऑफ आर्टच्या महिलांनी ‘घुमर’ हे पारंपरिक नृत्य सादर केले. ऑस्टिन (us Austin) पंजाबी कल्चरल असोसिएशनच्या महिलांनी ‘भांगडा’ आणि ‘गिद्धा’ नृत्य सादर केले. तेलगू कल्चरल असोसिएशनच्या कलाकारांनी देशभक्तीपूर्ण गाण्यावर नृत्य सादर केले. (us Austin)
(हेही वाचा – Narendra Modi: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रालयात बदलणार अनेक नियम, जाणून घ्या काय आहे खास?)
कार्यक्रमात (Shiv Jayanti) नऊवारी घातलेल्या महिला मिरवणुकीत पालखीमागे लेझीम नृत्य सादर करत होत्या. ढोल- ताशा, लेझीम आणि झांज यांच्या सादरीकरणाने मिरवणुकीची सांगता झाली.कॅपिटॉल बिल्डिंगच्या (Capitol Building) द ग्रेट वॉक वरून ढोल-ताशा लेझीमची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. (us Austin)
हे पहा –
Join Our WhatsApp Community