बेलापूर ते पेंधरदरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या सेवांमध्ये सोमवारपासून (८ एप्रिल) वाढ करण्याचा निर्णय ‘सिडको’ने घेतला आहे. त्यानुसार, बेलापूर मेट्रो स्थानक येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत १ तासाची, तर पेंधर येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Mumbai Pune Expressway : वाढत्या उन्हामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अवजड वाहनांना बंदी)
प्रवाशांकडून मागणी…
सिडको महामंडळाकडून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. या मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे, मात्र मेट्रोची वेळ सकाळी ६ ते रात्री १०पर्यंतच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. खारघर रेल्वे स्थानकाहून तळोजा आणि खारघर सेक्टर २७ ते ३६ परिसरातील प्रवाशांना दुप्पट भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
शेवटची मेट्रो रात्री ११.०० वाजता
प्रवाशांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन सिडकोने सोमवारपासून मेट्रो सेवेत वाढ केली आहे. त्यानुसार, बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री ११.०० वाजता पेंधरच्या दिशेने रवाना होईल, तर पेंधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community