Alagappa Chettiar : भारतीय व्यापारी आणि समाजसेवक सर अलगप्पा चेट्टियार

चेट्टियार (Alagappa Chettiar) यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. १९३७ मध्ये त्यांनी कोचीन टेक्सटाइल्स, नंतर केरळमधील त्रिशूरजवळ अलगप्पा नगर येथे अलगप्पा टेक्सटाइल्स सुरू केले.

167
Alagappa Chettiar : भारतीय व्यापारी आणि समाजसेवक सर अलगप्पा चेट्टियार

सर अलगप्पा चेट्टियार (Alagappa Chettiar) एक भारतीय व्यापारी आणि समाजसेवक होते. चेट्टियार यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ मध्ये तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कोट्टयूर येथे झाला. त्यांनी चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जेथे त्यांचे सर्वपल्ली राधाकृष्णन या शिक्षकांशी ओळख झाली, जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. १९३० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी नट्टुकोट्टाई नगरथर समुदायातून एमएची पदवी घेणारे ते पहिले व्यक्ती होते. (Alagappa Chettiar)

पदवीनंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. १९३३ मध्ये इंग्लंडमधील मिडल टेंपल, लंडन येथील बारसाठी ते पात्र ठरले आणि भारतातील चेट्टीनाड येथे ‘बार-ऍट-लॉ’ बनले. त्या काळात त्यांनी क्रॉयडन, लंडन येथे पायलट प्रमाणपत्र देखील मिळवले होते आणि विशेष म्हणजे स्टँडर्ड चार्टर्ड बँक, लंडनमध्ये ते पहिले भारतीय प्रशिक्षणार्थी बनले होते. (Alagappa Chettiar)

(हेही वाचा – Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल)

या क्षेत्रात केलं आघाडीने काम

चेट्टियार (Alagappa Chettiar) यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. १९३७ मध्ये त्यांनी कोचीन टेक्सटाइल्स, नंतर केरळमधील त्रिशूरजवळ अलगप्पा नगर येथे अलगप्पा टेक्सटाइल्स सुरू केले. त्यांच्या स्मरणार्थ कोचीन टेक्सटाइल्स कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या टाऊनशिपला “अलगप्पा नगर” असे नाव देण्यात आले आहे. रबर लागवड, कापड गिरण्या, विमा कंपन्या, हॉटेल्स, चित्रपटगृहे, स्टॉक एक्स्चेंज कंपनी आणि खाजगी विमान कंपनी यासह विविध क्षेत्रात त्यांनी आघाडीने काम केले आहे. (Alagappa Chettiar)

१९४६ साली वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांना knighted म्हणून सन्मानित करण्यात आले. तेव्हा एक उद्योजक म्हणून चेट्टियार (Alagappa Chettiar) यांच्या कार्याला ब्रिटीश सरकारने स्वीकृती दिली. तथापि, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी या पदवीचा त्याग केला. पुढे २६ जानेवारी १९५६ रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Alagappa Chettiar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.