- ऋजुता लुकतुके
सलग तीन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सना शुक्रवारी एक मोठा दिलासा मिळाला आहे. फ्रँचाईजीचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गुरुवारी उशिरा संघाच्या ताफ्यात दाखल झाला होता. आणि शुक्रवारी त्याने संपूर्ण सरावात भाग घेतला. आणि बराच वेळ फलंदाजीही केली. दोन तास तो फलंदाजीच्या नेट्समध्ये होता. (IPL 2024 Suryakumar Yadav)
No corner on the ground, no stand is safe – Surya dada is 🔙 🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/YUaBvMqgbc
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
सुरुवातीला त्याने थ्रो-डाऊनवर सराव केला. त्यानंतर मुंबईचा गोलंदाज कार्तिकेयनच्या फिरकीवर त्याने काही काळ सराव केला. त्याचा सराव बघता रविवारच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याची तो तयारी करत असल्याचंच दिसत होतं. जवळ जवळ ३ महिन्यांनी तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. (IPL 2024 Suryakumar Yadav)
Jiska humein tha intezaar.. 🤩🤌
सूर्या दादा is here, Paltan! 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/eL98y970Pe
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्याला हार्नियाचा त्रास सुरू झाला. आणि नंतर त्याचा घोटाही दुखावला. या दोन्ही दुखापतींवर त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. दक्षिण आफ्रिकेत उपचार घेतल्यानंतर मागचा महिनाभर तो बंगळुरूत दुखापती नंतरच्या पुनर्वसनासाठी व्यायाम करत होता. डिसेंबरपासून स्पर्धात्मक क्रिकेट तो खेळलेला नाही. (IPL 2024 Suryakumar Yadav)
आपला दादूस आला रे! 😍💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/0ZJldXIqE2
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा टी-२० मधील नंबर वन फलंदाज आहे. आणि तो तंदुरुस्त होणं ही मुंबई इंडियन्स संघाला दिलासा देणारी बातमी तर आहेच. शिवाय भारतीय संघासाठीही महत्त्वाची बातमी आहे. कारण, जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आणि त्यापूर्वी फलंदाजीची लय सापडणं महत्त्वाचं असेल. आयपीएलचे पहिले तीन सामने तो खेळू शकला नव्हता. पण, रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तो खेळणार आहे. (IPL 2024 Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community