Fastest Balls in IPL : आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत मयंक यादवची दमदार एंट्री 

Fastest Balls in IPL : मयंक यादवने २०२४ च्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे 

189
Fastest Balls in IPL : आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत मयंक यादवची दमदार एंट्री 
Fastest Balls in IPL : आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत मयंक यादवची दमदार एंट्री 
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअर लीग ही क्रिकेटमधील एक मानाची लीग आहे. जागतिक दर्जाचं क्रिकेट इथं पाहायला मिळतं. कारण, जगातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये खेळतात. आतापर्यंत या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवही नसलेले गोलंदाज चांगली कामगिरी करून गेले आहेत. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या हंगामातील दीपक चहर जो अजून भारतासाठी खेळलेला नाही. पण, चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) या फ्रँचाईजीसाठी त्याने चांगली कामगिरी करताना ऑरेंज कॅपही पटकावली होती. तर यंदाच्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Supergiants)  तेज गोलंदाज मयंक यादव आपल्या तेज तर्रार गोलंदाजी करत फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आहे. ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करणारा मयंक दिशा आणि टप्प्यालाही अचूक आहे.  (Fastest Balls in IPL)

(हेही वाचा- Kaizen Institute: मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांना कायझेनचे प्रशिक्षण)

लीग भारतात होत असल्याने फिरकीपटूंचं वर्चस्व असलं तरी तेज गोलंदाजांनीही मैदान गाजवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे वेगवान चेंडूंनी अनेकदा फलंदाजांना चकवलं आहे. पहिल्या हंगामात डेल स्टेनच्या स्टेनगनची चर्चा होती. तर त्यानंतर ब्रेट ली, शॉन टेट अशी तेज गोलंदाजांनी वेगवान चेंडूंचे विक्रम या स्पर्धेत केले आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत वेगवान ठरला आहे तो मयंक यादव. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकला होता. (Fastest Balls in IPL)

या लेखात आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू पाहूया. यासाठी ताशी वेग गृहित धरला आहे.

क्रमांक

खेळाडू

संघ

वेग (किमी/ताशी)

शॉन टेट

राजस्थान रॉयल्स

१५७.७१

लॉकी फर्ग्युसन

कोलकाता नाईट रायडर्स

१५७.३

उमरान मलिक

सनरायजर्स हैद्राबाद

१५७

मयंक यादव

लखनौ सुपरजायंट्‌स

१५६.७

एनरिच नॉर्वे

दिल्ली कॅपिटल्स

१५६.२२

उमरान मलिक

सनरायजर्स हैद्राबाद

१५६

एनरिच नॉर्वे

दिल्ली कॅपिटल्स

१५५.१

उमरान मलिक

सनरायजर्स हैद्राबाद

१५४.८

एनरिच नॉर्वे

दिल्ली कॅपिटल्स

१५४.७

१०

डेल स्टेन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१५४.४०

२४ वर्षीय भारतीय गोलंदाज उमरान मलिक या यादीत मानाने झळकतोय. जम्मूच्या काश्मीरमधून आलेला हा क्रिकेटपटू सनरायजर्स हैद्राबादसाठी (Sunrisers Hyderabad) खेळतो. आणि तो देशातील सगळ्यात वेगवान गोलंदाज आहे. २०२२ मध्ये आयर्लंड विरुद्ध त्याने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. या संघात जसप्रीत बुमराच कर्णधार होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मलिकचा खेळ आणखी सुधारला आहे. (Fastest Balls in IPL)

(हेही वाचा- IPL 2024 Suryakumar Yadav : अखेर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल)

उमरानच्या साथीला मयंक यादवनेही या यादीत आता स्थान मिळवलं आहे. हे आयपीएल आपल्या गोलंदाजीने तो गाजवतोय. (Fastest Balls in IPL)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.