Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट राज ठाकरेंना भेटले; चर्चेला उधाण 

राज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या (९ एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

231
Raj Thackeray मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट राज ठाकरेंना भे
Raj Thackeray मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट राज ठाकरेंना भे

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanay Shirsath) यांनी मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मनसेचा महायुतीमध्ये समावेश लांबला आहे, अशा वेळी संजय शिरसाट यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीला राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे; परंतु अशी कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शिरसाट म्हणाले. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये (Mahayuti) सामील होणार अशा चर्चा सुरु झाल्या, परंतु काही दिवसानंतर ही चर्चा थांबली. आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेल्यानंतर पुन्हा या चर्चेला उधाण आले आहे. (Raj Thackeray)

( हेही वाचा – BJP Foundation Day: लोकसभा निवडणुकीत एनडीएचे ‘400 हून अधिक’ हे वचन पूर्ण करा, भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त जे. पी. नड्डा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

शिरसाट नेमके काय म्हणाले?

दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना शिरसाट म्हणाले की, “राज ठाकरेंचे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे संबंध आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात जेव्हा सभा व्हायच्या, त्यावेळी राज ठाकरे आवर्जून बाळासाहेबांच्या सोबत असायचे. शिवसेनाप्रमुख (Shivsena) म्हणायचे मनभेद नसायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचे आणि आमचे कुठेही मतभेद नाहीत. राज ठाकरेंना भेटायची फार दिवसांची इच्छा होती. या भेटीत कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाही. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. परंतु आता पुढे काय करायला पाहिजे, यांनी काय करायला हवे याबाबत चर्चा झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम आम्ही केले, असे शिरसाट म्हणाले. (Raj Thackeray)

(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)

राज ठाकरेंची भूमिका गुढीपाडव्याला समजणार 

आजच्या गप्पा चहा आणि जुन्या आठवणींवर झाल्या असे म्हणत राज ठाकरे यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्हीच पहिले असणार आहोत. सोबत आल्यास नक्कीच महायुतीला फायदा होणार आहे. महायुतीची आणखी ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील. तसेच राज ठाकरे यांचं सध्या सर्व लक्ष त्यांच्या गुढी पाडवा (Gudhi Padwa) मेळाव्यावर आहे. माझी जी काही मळमळ आहे, ती मी माझ्या मेळाव्यात काढेल. त्या मेळाव्यात मी बोललेच मात्र त्यानंतर मी निर्णय घेईल असे राज ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय शिरसाट म्हणाले. (Raj Thackeray)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.