लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha election 2024) ची घोषणा केल्यानंतर देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील (West Bengal) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लोक तृणमूल काँग्रेसच्या बॅनरसमोर आणि ममता बॅनर्जींच्या फोटोसमोर लुंगी, नमाजी टोप्या आणि साड्यांचे वाटप करताना दिसत आहेत. भाजपाच्या राज्य युनिटने शुक्रवारी निवडणूक आयोगकडे याबाबत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. (Mamata Banerjee)
आचारसंहिता चालू असताना मतदान संघात शिधा वितरित
TMC distributing iftar items & Eid gifts in a bag with Mamata Banerjee & Abhishek Banerjee’s face printed on it.
Incident of Raghunathpur under Bankura Loksabha.@ECISVEEP please take note.This is the same Trinamool candidate Arup Chakraborty who said a few days back that… pic.twitter.com/by7h3XhoF5
— Keya Ghosh (Modi Ka Parivar) (@keyakahe) April 5, 2024
३४ सेकंदाची व्हायरल व्हिडिओ ही पश्चिम बंगालमधील भाजपचे मीडिया सह-प्रभारी किया घोष (keya ghosh) यांनी शेअर केली आहे. रघुनाथपूर हे बांकुरा लोकसभा मतदारसंघात येत असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये वर्णन केले आहे. तृणमूल काँग्रेसने ईदच्या सणामध्ये (Eid Festival) भेटवस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप किया घोष यांनी केला. या भेटवस्तूंवर ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. किया घोष असेही म्हणाले की, या भेटवस्तू टीएमसीचे (TMC) नेते अनुप चक्रवर्ती यांच्या मतदारसंघात वितरित करण्यात येत आहेत. (Mamata Banerjee)
(हेही वाचा – Fastest Balls in IPL : आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत मयंक यादवची दमदार एंट्री )
कारवाईची मागणी
या पिशवीच्या आत लुंगी (तहमाद), नमाजी टोपी, साड्या, लच्छा (ज्यापासून शेवया बनवल्या जातात) आणि सुका मेवा भरलेला आहे. पिशव्यांवर ‘इफ्तार साहित्य, ईद भेटवस्तू’ असे लिहिले आहे. याशिवाय एका ठिकाणी ‘मायनॉरिटी फ्रंट पुरुलिया डिस्ट्रिक्ट’ असे लिहिले आहे. व्हिडिओच्या शेवटी ग्रुप फोटो सेशनही घेण्यात आले. भाजप नेते किया घोष यांनी निवडणूक आयोगाला टॅग करत यावर कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठला आहे याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. (Mamata Banerjee)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community