- ऋजुता लुकतुके
फोर्ब्ज मासिकाने २०२४ मधील श्रीमंत व्यक्तींची यादी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. यात फ्रेंच उद्योगपती बरनार्ड आरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारतात मुकेश अंबानी सगळ्यात श्रीमंत आहेत. या यादीचा बारकाईने अभ्यास केला तर अब्जाधीशांविषयी इतरही माहिती आपल्याला मिळू शकते. तुम्हाला जगातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण आहे, हे माहीत आहे का? ब्राझीलची १९ वर्षाची तरुणी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश आहे. (Forbes Billionaires List)
ब्राझीलची १९ वर्ष वय असलेली विद्यार्थिनी लिव्हिया वोग्ट ही सर्वात तरुण अब्जाधीश बनली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत याबाबतची माहिती देण्यात आलीय. लिव्हिया वोग्ट या तरुणीकडे सध्या एकूण संपत्ती ही १.१ अब्ज डॉलर्स आहे. दरम्यान, भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल यांचा नंबर लागतो. (Forbes Billionaires List)
(हेही वाचा – India-Maldives Trade : भारत ‘या’ गोष्टी मालदीवला करणार निर्यात)
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Françoise Bettencourt Meyers) या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये त्यांचा १५ वा क्रमांक लागतो. मेयर्स यांच्याकडं ९९.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर ॲलिस वॉल्टन या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. ॲलिस यांची एकूण संपत्ती ही ७२.३ अब्ज डॉलर आहे. कोच इंडस्ट्रीजच्या ज्युलिया कोच यांचा जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला म्हणून नंबर लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही ६४.३ अब्ज डॉलर आहे. जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही ३३.५ अब्ज डॉलर्स आहे. (Forbes Billionaires List)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community