१७ मे रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीचे प्रचंड नुकसान करणारे तौक्ते चक्री वादळाने किती रौद्र रूप धारण केले होते, याचा प्रत्यक्ष व्हिडिओ पहाल तर थरकाप उडेल. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या या वादळाने जणू समुद्र आणि आकाशाची भेट घडवून आणली होती. हा नजारा कॅमेरात कैद झाला. अरबी समुद्रात तौक्ते चक्री वादळाने अक्षरशः थैमान घातले. ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र, मुंबईच्या समुद्रकिनारी थरकाप उडवणारे असे होते दृश्यसमुद्रात आलेल्या या वादळाने मुंबईसह कोकण किनारपट्टीत तांडव केले. ताशी १२० किमी वेगाने वारे वाहत होते, त्या वाऱ्याच्या वेगाने पावसाचे ढग समुद्रावर फिरत राहिले आणि त्यातून निर्माण झाले समुद्राच्या पाण्यात चक्री वादळ. परिणामी समुद्राच्या किनारी उंचच उंच लाटा उसळल्या.
Join Our WhatsApp Communityपहा! थरकाप उडवणारे तौक्ते वादळाचे रौद्र रूप!
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वादळाने तांडव केले. ताशी १२० किमी वेगाने वारे वाहत होते.