North Mumbai Lok Sabha Constituency : मालाडमध्ये मतदारांची संख्या सर्वांधिक

सन २००१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४७ हजार २०८ एवढी होती, तर आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील एकूण मतदार संघांची १७ लाख ७४ हजार ४९० एवढी मतदारांची संख्या आहे.

1050
North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबई काँग्रेसला, घोसाळकरांना ठाकरेंनी गाजर दाखवले तर नाही ना?
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात मागील २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल १ लाख २७ हजार २८२ मतदारांची संख्या वाढलेली आहे. विशेष म्हणजे या लोकसभा मतदार संघातील मालाड विधानसभा मतदार संघात सर्वांधिक म्हणजे ४० हजार ८८३ मतदार वाढल्याचे मतदार नोंदणीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. (North Mumbai Lok Sabha Constituency)

सन २००१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४७ हजार २०८ एवढी होती, तर आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील एकूण मतदार संघांची १७ लाख ७४ हजार ४९० एवढी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४च्या निवडणुकीत मतदारांची संख्या १लाख २७ हजार २८२ मतदारांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (North Mumbai Lok Sabha Constituency)

पुरुष मतदारांची संख्या ६० हजारांनी वाढली

सन २०१९च्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ९० हजार ०२७ एवढी होती, तर सन २०२४मध्ये पुरुष मतदारासंची संख्या ९ लाख ५० हजार ०२९ एवढी झाली आहे. त्यामुळे पुरुष मतदारांची संख्या ६० हजारांनी वाढली गेली आहे. (North Mumbai Lok Sabha Constituency)

महिला मतदारांच्या संख्येत ६७ हजार २०७ ने वाढ

तर सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या ७ लाख ५६ हजार ८४९ एवढी होती, तर सन २०२४मध्ये महिला मतदारांची ही संख्या ८ लाख २४ हजार ०५२ एवढी झाली आहे. त्यामुळे महिला मतदारांच्या संख्येत ६७ हजार २०७ एवढी वाढ झाली आहे. (North Mumbai Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक)

कांदिवली सर्वांत कमी मतदारांची संख्या

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात बोरीवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून यासर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये १ लाख २७ हजार २८२ एवढ्या मतदारांची संख्या या निवडणुकीत वाढलेली आहे. या सहा विधानसभा क्षेत्रातील कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात सर्वांत कमी म्हणजे ९ हजार ८१८ मतदारांची संख्या वाढली आहे, तर सर्वांधित मतदारांची संख्या मालाड विधानसभा मतदार संघात वाढलेली आहे. या मालाड विधानसभा मतदार संघात ४० हजार ८८३ मतदारांची संख्या वाढलेली आहे. (North Mumbai Lok Sabha Constituency)

  • सनद २०२४मधील मतदार : १७ लाख ७४ हजार ४९०
  • सन २०१९मधील मतदार : १६ लाख ४७ हजार २०८
सन २०२४मधील विधानसभा निहाय मतदार संख्या
  • बोरीवली : ३,११,२९८ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या १९,५६०)
  • दहिसर : २,६७,३९३ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या १६,७५८)
  • मागाठाणे : २,९१,३७६ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या २३,१२७)
  • कांदिवली पूर्व : २,९९,९०२ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या ९,८१८)
  • चारकोप : २, ९९,९०२ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या १७,१३६)
  • मालाड : ३,२९, ५०४ (२०१९च्या तुलनेत वाढलेली संख्या १९,५६०) (North Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.