Sun Stroke: रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळणार; गुढीपाडव्याला विदर्भ-मराठवाड्यात गारपीट होणार?

157
Sun Stroke: रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळणार; गुढीपाडव्याला विदर्भ-मराठवाड्यात गारपीट होणार?
Sun Stroke: रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळणार; गुढीपाडव्याला विदर्भ-मराठवाड्यात गारपीट होणार?

रखरखत्या उन्हापासून (Sun Stroke) नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार असा अंदाज आहे. कारण, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक (hailstorm) परिस्थिती तयार होत आहे. महाराष्ट्रात हवामान विभागाकडून (IMD) पाऊस आणि गारपिटीचा (hailstorm) अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Sun Stroke) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Sun Stroke)

(हेही वाचा – Statue of Liberty : जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के)

उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. (Sun Stroke) जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत हिमवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशातील ३३ जिल्ह्यांत गारांसह पाऊस (hailstorm) पडू शकतो. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. (Sun Stroke)

(हेही वाचा –Department of Meteorology: मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात ऑरेंज अलर्टसह गारपीटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर)

विशेष म्हणजे विदर्भातील काही भागात गारपीट (hailstorm) होणार असे देखील हवामान खात्याने आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. गुढीपाडव्याला राज्यातील विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपीट (hailstorm) होणार असे बोलले जात आहे. राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मात्र आजपासून (७ एप्रिल) १० एप्रिल पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. (Sun Stroke)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.