Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना; किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा

Ramtek Lok Sabha : काँग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

204
Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना; किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा
Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना; किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला (Congress Party) मोठा धक्का बसला आहे. उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेसचे नेते किशोर गजभिये (Congress Leader Kishore Gajbhiye) यांनी बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाच आता किशोर गजभिये यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण…)

उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा होता दावा

रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता चहांदे यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसमधून बंडखोरी केलेले किशोर गजभिये यांना समर्थन दिले आहे.  रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरून उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. त्या वेळी काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात आली होती.

या लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर चारच दिवसांत जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यांचे पती श्याम बर्वे यांनी याच जागेवरून डमी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर गजभिये यांची बंडखोरी आणि वंचितची भूमिका यांमुळे जागा मिळाली, तरी तिथे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Ramtek Lok Sabha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.