Kanhaiya Kumar : ‘भारत तेरे टुकडे होंगे’ घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का; काँग्रेस देऊ शकते उमेदवारी

200
Kanhaiya Kumar : 'भारत तेरे टुकडे होंगे' घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का;काँग्रेस देऊ शकते उमेदवारी
Kanhaiya Kumar : 'भारत तेरे टुकडे होंगे' घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का;काँग्रेस देऊ शकते उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाने दिल्लीत (Delhi) युती केली आहे. जागावाटपात दिल्लीत काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने या तीन जागांसाठी अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यापैकी एका जागेवर कन्हैया कुमारला (Kanhaiya Kumar) उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.

कन्हैय्या कुमार हा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. २०१६ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार महंमद अफझल याला फाशी दिल्यानंतर ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणांमुळे दिल्लीतील जेएनयू प्रकाशात आले होते. त्या वेळी कन्हैया कुमार, उमर खालीद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या परिसरात देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली सरकारने 2016 त्यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालवण्यास मान्यता दिली होती.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तुम्हाला माहिती आहे का लोकसभेच्या उमेदवारांकडे एकूण किती संपत्ती? जाणुन घ्या)

सीपीआयच्या तिकिटावर लढवली होती लोकसभा 

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही कन्हैय्या कुमार जनमत आजमावले होते. त्या वेळी बिहारमधील बेगुसराय येथून त्याने सीपीआयच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी त्या वेळी त्याचा मोठ्या मतसंख्येने पराभव केला होता. त्यानंतर कन्हैय्या कुमारने सप्टेंबर 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधींच्या न्याय यात्रेदरम्यान ते अनेकदा त्यांच्यासोबत दिसले होते.

आता काँग्रेस पक्ष कन्हैयाकुमारला दिल्लीतील एका जागेवरून निवडणूक रिंगणात उतरवू शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत होणार आहे. उमेदवारी मिळाली, तर कन्हैयाकुमारचा सामना भाजपचे दिल्लीचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांच्याशी होईल. मनोज तिवारी यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ही जागा जिंकली आहे. (Kanhaiya Kumar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.