एका व्यक्तीवर दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा रद्द करताना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) मोठी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखादी स्त्री संमतीने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. जोपर्यंत लग्नाच्या खोट्या वचनाचा पुरावा पूर्णपणे स्पष्ट होत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi High Court) न्यायमूर्ती अनुप कुमार मेंदिरट्टा यांनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. (Delhi High Court)
(हेही वाचा –Kanhaiya Kumar : ‘भारत तेरे टुकडे होंगे’ घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का; काँग्रेस देऊ शकते उमेदवारी)
महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला होता. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे निश्चित केले होते. मात्र, आता हा वाद परस्पर संमतीने सोडवून दोघांनी लग्न केले आहे. (Delhi High Court)
(हेही वाचा –Madha Loksabha Election: माढ्यात महायुतीला धक्का; संजय कोकोटे यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश)
महिलेने न्यायालयात (Delhi High Court) सांगितले की, आता ती त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहत आहे, ज्याच्यामुळे तिला हा खटला संपवायचा आहे. चुकीच्या हेतूने एफआयआर नोंदवण्यात आल्याची कबुली तिने दिली. घरच्यांच्या विरोधामुळे तरुणाला लग्न करणे शक्य होत नव्हते. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा (Anoop Kumar Mendiratta) यांनी हे प्रकरण रद्द केले आहे. (Delhi High Court)
हे पहा –
Join Our WhatsApp Community