BJP Loksabha Election 2024 : महाराष्ट्र अन् दक्षिणेसह ‘इतक्या’ जागांवर भाजपाचा पेपर कठीण; काय सांगते अंतर्गत सर्व्हेक्षण

BJP Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

257
 Thane Lok Sabha Constituency: ठाण्यात यंदा भाजपाचा उमेदवार?
 Thane Lok Sabha Constituency: ठाण्यात यंदा भाजपाचा उमेदवार?

‘अबकी बार, ३७० पार’ ही घोषणा भाजपाने केली आहे. घटक पक्षांसह ४०० पार जाणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. या घोषणेनंतरही दक्षिण भारतासह आठ राज्यांतील १६५ जागांबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साशंक आहेत. प्रामुख्याने भाजपाची युती कमकुवत दिसत आहे किंवा युती अपयशी ठरली आहे, अशा जागांचा त्यात समावेश आहे. (BJP Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Kanhaiya Kumar : ‘भारत तेरे टुकडे होंगे’ घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का; काँग्रेस देऊ शकते उमेदवारी)

१६५ जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची स्थिती चिंताजनक

भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, पंजाब, हरियाणातील सुमारे १६५ जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची स्थिती चिंताजनक आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपा नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे सरकार असून, त्यावर अँटी-इन्कम्बन्सीचा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात आहे. बिहारदेखील भाजपासाठी चिंतेचे सर्वांत मोठे कारण आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूशी युती असूनही अहवाल फारसा उत्साहवर्धक नाही. बिहारमध्ये भाजपला ४० पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत; पण जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीबाबत समाजात असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो.

ओडिशात बिजू जनता दलाशी युती अयशस्वी झाल्याची, तसेच पंजाबमध्ये अकाली दलाशी युती न झाल्याची किंमत भाजपाला चुकवावी लागू शकते.हरियाणातही भाजपने चौटाला यांच्या आयएनएलडीसोबतची युती तोडली, त्यामुळे तीन ते चार जागांवर तोटा होऊ शकतो. झारखंडमध्ये हेमंत सोरेन, तर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे नुकसान होऊ शकते.

अशा प्रकारे एकूणच कितीही मोदी लाट दिसत असली, तरी यंदाची निवडणूक भाजपसाठी कठीण जाऊ शकते. (BJP Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.