लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसे रोखायचे, हे सरकारसमोर आव्हान आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.  

147

सध्या शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सरकारच्या वतीने धोरणात्मक भाष्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना महत्व प्राप्त होऊ लागले आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याने मंत्री आदित्य ठाकरे यांना राज्यावरील विविध संकटे, प्रकल्प अथवा राजकीय टीकाटिपण्णींवर सरकारची भूमिका काय असणार, हे आधीच माहित असते, म्हणूनच कि काय त्यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे १ जूननंतर काय होणार, यावर थेट भाष्य केले आहे.

लॉकडाऊन संपायला २ आठवडे असतानाच मांडली भूमिका!  

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने विरोधाला सामोरे जात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. विरोधक, व्यापारी, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक या सर्वांचा विरोध पत्करून ठाकरे सरकारने महाराष्ट्र बंद केला. सुरुवातीला हा लॉकडाऊन १५ मेपर्यंत होता. त्यानंतर तो १ जूनपर्यंत वाढवला. त्यामुळे सरकारप्रती नाराजीचा सूर आहे. अशा वातावरणात लॉकडाऊन संपण्याला आता अवघे २ आठवडे बाकी असताना सरकार लॉकडाऊन वाढवणार का, असा प्रश्न पडला आहे. त्यावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

(हेही वाचा : प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )

रुग्ण संख्येवर निर्णय अवलंबून!

सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले कि, लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक घराबाहेर फिरू नका. पुढील दिवसात कोरोनाची किती रुग्ण संख्या आहे, त्यावर लॉकडाऊनचा निर्णय अवलंबून असणार आहे, असे नमूद केले आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर सरकार भर देत आहे. प्रत्येकाने चाचणी करावी. कारण लॉकडाऊन उठवायचा कि कायम ठेवायचा हे रुग्ण संख्येवर अवलंबून असणार आहे. आरोग्य हे आमच्यासाठी प्राधान्य आहे. राज्यात लसीकरण वेगात सुरु आहे. आतापर्यंत २ कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसे रोखायचे, हे सरकारसमोर आव्हान आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.