The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी दहशतवाद्यांकडून चित्रपट निर्मात्याला धमक्या

एका सत्य घटनेवर आधारित The Diary Of West Bengal चित्रपट बनवला आहे. मात्र पाकिस्तानातील कराची येथील ‘जामिया दारूल उलूम’ या दहशतवादी संघटनेने या चित्रपटाच्या विरोधात फतवा प्रसारित केला आहे.

259
The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून धमक्या मिळत आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार चित्रपटाचे प्रदर्शन राज्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यागी यांनी केला.
जितेंद्र त्यागी पुढे म्हणाले की, आम्ही एका सत्य घटनेवर आधारित The Diary Of West Bengal चित्रपट बनवला होता. त्यासाठी पाकिस्तानातील कराची येथील ‘जामिया दारूल उलूम’ या दहशतवादी संघटनेने आमच्या विरोधात फतवा प्रसारित केला आहे. यात चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे. आता चित्रपट भारतात बनवण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांची परवानगी घ्यावी लागेल का? ‘बंगालचे ममता बॅनर्जी सरकार पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचे लोक चालवत आहेत’, हे आता आपण समजून घेतले पाहिजे का? कारण त्यांनाच चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आहे आणि येथे ममता बॅनर्जी यांचे सरकार तो प्रदर्शित होऊ देत नाही. या दहशतवाद्यांशी त्यांचे काय संबंध आहेत, असे समजायचे? अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात केवळ साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनाच उपलब्ध आहे का? चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर आमच्यासारख्या स्वतंत्र विचारसरणीच्या लोकांना काही अधिकार नाही का? या चित्रपटाच्या माध्यमातून आतापर्यंत आमचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कोण करणार?, असे त्यागी म्हणाले.
जर बंगालमध्ये सर्व काही ठीक चालले असेल, तर ममता सरकार आमचा The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित का होऊ देत नाही? ममता बॅनर्जी यांचे सरकार आमच्या मागे का लागत आहे? चित्रपट बनवून आम्ही गुन्हा केला आहे का? ममता सरकार कोणतेही स्पष्ट कारण का देत नाही? ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगालमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना साहाय्य करत नसेल, तर ते हे उघडपणे का सांगत नाही?, असेही त्यागी म्हणाले.
चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा म्हणाले की, या चित्रपटामध्ये आम्ही बंगालमधील वाढत्या संघटित गुन्हेगारी आणि लक्ष्यित हिंसाचार यांकडे लक्ष वेधले आहे, आता ही गोष्ट केवळ त्याचे समर्थक असलेल्यांनाच वाईट वाटू शकते, मग आम्ही काय करावे ? ‘मिशन कश्मीर’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘काश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ सारखे चित्रपट या देशात प्रदर्शित होऊ शकतात, तर मग आमचा चित्रपट प्रदर्शित करण्यात काय हानी आहे? माझा हा चित्रपट बनवून पूर्ण झाला आहे आणि तो २७ एप्रिलला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

काय आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये?

The Diary Of West Bengal  चित्रपट बंगालच्या राजकीय आणि धार्मिक स्थितीचे चित्रण आहे. बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना तृणमूल काँग्रेस सरकार स्वतःच्या राजकीय लाभासाठी राज्यात पद्धतीशीरमध्ये वसवत आहे. हे मुसलमान येथे हिंसाचार करत असल्याने हिंदूंना तेथून पलायन करावे लागत आहे. हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ममता बॅनर्जी सरकार मुसलमानांना झुकते माप देत आहे, असे या चित्रपटाच्या विज्ञापनामधून दाखवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.