Sudhir Mungantiwar : पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे चंद्रपूरात पुन्हा फुलेल का कमळ ?   

आताच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी लकी ठरतील काय ?

230
Sudhir Mungantiwar : पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे चंद्रपूरात पुन्हा फुलेल का कमळ ?   

लोकसभा २०२४ (Lok Sabha 2024) च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोमवारी ८ एप्रिल रोजी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. यापूर्वी २०१४ च्या लोकसभेमध्ये भाजपाचे उमेदवार हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा चंद्रपूर येथे झाली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने अहिर लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मोदी आले नाहीत आणि या निवडणुकीत अहिर यांना पराभवाचा सामना करावा लागला. आताच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी लकी ठरतील काय? अशी चर्चा राजकारणात रंगू लागली आहे. (Sudhir Mungantiwar)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आघाडीतले ‘मोठा भाऊ’ की ‘खोटा भाऊ’?)

मोदी लकी ठरतील काय ?

महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चंद्रपूरसह (Chandrapur) आदि ठिकाणी लोकसभा निवडणूक होणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा (Chandrapur-Varni-aarni Lok sabha 2024) मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या दिवंगत बाळू धानोरकर (Baalu Dhanorkar) यांनी भाजपाचे दिग्गज नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे भाजपाचे लक्ष असून, मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सोमवार, ८ एप्रिलला नरेंद्र मोदी (April 08) यांची सभा होत आहे. मुनगंटीवारांसाठी ही सभा फार महत्वाची असणार आहे. मोदी पुन्हा एकदा चंद्रपूर भाजपासाठी लकी ठरेल का ? पहावे लागणार आहे. (Sudhir Mungantiwar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.