सांगलीच्या जागेवर एकमत होत नसेल, तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसने उबाठा गटाला दिला आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे घाबरले आहेत. जर बाळासाहेबांचे रक्त आणि बाणा उद्धव ठाकरेंमध्ये असेल, तर हिम्मत दाखवून त्यांनी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत करावी, असे आव्हान भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवार, ७ एप्रिल रोजी दिले.
कणकवली येथे माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, संजय राऊत ज्या सांगलीत तोंड काळे करत फिरत आहे, तेथे वसंतदादा पाटील यांच्यासारखे जेष्ठ नेते होऊन गेले. उद्धव ठाकरेंची हवा असल्याचे राऊत भासवत आहे. त्यामुळे फ्रेंडली फाईट करून सिद्ध करा, की तुमच्या अंगात बाळासाहेबांचा बाणा आहे. संजय राऊत ज्या वॉर्ड मध्ये राहतो, तिथे उबाठाचा नगरसेवकही नाही आणि हा लोकांचे प्रचार करीत फिरतो. त्यामुळे त्याने आपली लायकी ओळखावी, असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.
(हेही वाचा The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी दहशतवाद्यांकडून चित्रपट निर्मात्याला धमक्या)
काँग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी याआधी घाणेरडे आरोप केले. असे उद्धव ठाकरे त्यांना चालत असतील, तर तुम्हाला आमच्यावर टीका कण्याचा अधिकार नाही. शरद पवारांना शिव्या घालून त्यांच्या सोबत तुम्ही आहातच ना? मग आम्हाला कोणत्या तोंडाने बोलता? असा सलावही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community