Prakash Ambedkar : कॉँग्रेसच्या प्रस्तावावर वंचितची खोचक टीका; प्रकाश आंबेडकर म्हणाले…

222
लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या निश्चित झाल्या आहेत, अशातच महाविकास आघाडीपासून दूर गेलेल्या वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार घोषित केले आहेत. अशातच कॉँग्रेसचेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पुन्हा विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत त्यांना नाव प्रस्ताव पाठवणार असल्याचे म्हटले, त्यावर आंबेडकर यांनी कॉँग्रेसच्या या प्रस्तावाच्या भाषेवर खोचक टीका केली. याला वरातीमागून घाेडे असेच म्हणावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातील उर्वरित जागांचा निर्णय दाेन दिवसात जाहीर करणार असल्याचेही सांगितले. यशवंत भवन निवासस्थानी आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर बाेलताना उद्धवसेना व काँग्रेसमधील जागांचा वाद आता रस्त्यापर्यंत आला असल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण अगाेदरच काँग्रेसला अवगत केले हाेते. पंरतु, राज्यात काँग्रेसला नेताच नसल्याची टीका करताना काँग्रेसला निर्णय घेता आला नसल्याचा आराेपही त्यांनी केला. यामुळे काँग्रेसचे जिल्हास्तरावरील नेते स्वत:ला असुरक्षित मानत असून, भविष्यातील विधानसभा डाेळ्यासमाेर ठेवून आता ते भाजपाचा पराभव कसा करता येईल या दृष्टीने स्थानिक पातळीवर निर्णय घेत असल्याचे ते (Prakash Ambedkar)  म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.