महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा चंद्रपुरात होणार आहे. चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs as well as Fisheries Minister Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी ते सोमवारी, (८ एप्रिल) चंद्रपुरात येणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना बळकटी देण्यासाठी मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात होणार आहे.
मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, सायंकाळी ४ वाजता ही सभा होईल. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. विकासकामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात मुनगंटीवार यांना यश आले आहे. अशात देशातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, महिला व तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘मोदी की गॅरंटी’ देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून सर्वसामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
(हेही वाचा – Accident in Nagpur: एका ट्रकने १२ गाड्यांना उडवलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल)
पंतप्रधानांचे व्हिजन मुनगंटीवारांची वाटचाल…
मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची प्रगती साधताना एक नवा आदर्श भारतीयांपुढे निर्माण केला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मुनगंटीवार यांच्या कार्याची जाहीरपणे प्रशंसा केलेली आहे. यात २ कोटी वृक्ष लागवड, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शोर्य अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल मन की बात मध्ये कौतुक,ताडोबा अंधारीमध्ये आभासी भिंतीचा प्रयोग, ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदीनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे सुद्धा कौतुक केले आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण
मुनगंटीवार यांनी गेल्या १० वर्षांत चंद्रपूर लोकसभेत मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या पाठिंब्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे हा प्रदेश विकासाच्या नव्या मार्गावर मार्गक्रमण करू लागला आहे. बल्लारपूर ते तेलंगाणा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र सरकारने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चामोर्शी गावात सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आष्टी गावाजवळ वैनगंगा नदीवर पूल बांधला आहे. यासोबतच केंद्र सरकारने खूप वर्षापासून मागणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा नदीवरील पुलाचे कामदेखील पूर्ण केले आहे.
मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या भावना…
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध आहे. जनताही यात सहकार्य करीत आहे. विकासकामांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल निवडणुकीत नक्कीच साथ देईल. या प्रवासात देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने मला अतीव आनंद होत आहे.अशा भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहे.
हेही पहा –