World Biggest Cricket Stadium : जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडिअम विषयी ५ रंजक गोष्टी

World Biggest Cricket Stadium : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम हे जगातील सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडिअम आहे

159
World Biggest Cricket Stadium : जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडिअम विषयी ५ रंजक गोष्टी
World Biggest Cricket Stadium : जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडिअम विषयी ५ रंजक गोष्टी
  • ऋजुता लुकतुके

गुजरातमध्ये १९८२ पासून सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअम (Sardar Patel Cricket Stadium) अस्तित्वात होतं. आणि तिथे १९८७, १९९६ आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकातील काही महत्त्वाच्या लढतीही पार पडल्या होत्या. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचं हे मैदान देशातील एक मुख्य कसोटी केंद्रही होतं. २०१४ मध्ये हे मैदान पाडून तिथं नवीन आणि अद्ययावत क्रिकेट स्टेडिअम उभारण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला. नवीन स्टेडिअम आधीपेक्षा मोठं आणि अगदी वाहनतळाची सोय असलेलंही असावं असा त्यांचा कटाक्ष होता. बांधकामाचा निर्णय झाल्या झाल्या एका वर्षातच म्हणजे सप्टेंबर २०१५ मध्ये आधीचं सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअम नुतनीकरणासाठी पाडण्यात आलं.  (World Biggest Cricket Stadium)

(हेही वाचा- Turdal Expensive: तूरडाळीला अवकाळी पावसाचा फटका, दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार; वाचा नवीन दरवाढ)

या जागी जगातील सर्वात जास्त आसन क्षमतेचं स्टेडिअम उभं रहावं अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इच्छा होती. त्यानुसार आराखडा तयार जाला आणि २०१५ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत आताचं नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअम उभं राहिलं. या स्टे़डिअमविषयी ५ रंजक गोष्टी जाणून घेऊया,  (World Biggest Cricket Stadium)

१. ‘नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअम’ असं नामकरण 

एखादी नामांकित व्यक्ती जिवंत असताना त्यांचं नाव मैदानाला दिलं जाण्याची ही पहिलीच वेळ होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये यजमान गुजरात क्रिकेट असोसिएशनने कार्यकारिणीत ठराव मांडून या नावाला संमती दिली होती. नरेंद्र मोदी तेव्हा देशाचे पंतप्रधान होते. आणि यापूर्वी २००९ ते २०१४ या कालावधीत गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. तसंच २००१ ते २०१४ या कालावधीत ते गुजरातचे मुख्यमंत्रीही होते. त्यावरून नवीन क्रिकेट स्टेडिअमला त्यांचं नाव देण्यात आलं.  (World Biggest Cricket Stadium)

सरदार पटेल स्पोर्ट्स संकुलात वसलेलं हे क्रिकेट मैदान १,३२,००० आसन क्षमतेचं म्हणजे जगातील सगळ्यात मोठं क्रिकेट मैदान आहे. यात ४ ड्रेसिंग रुम, ११ खेळपट्टया आणि २ सरावाची मैदानं आहेत.  (World Biggest Cricket Stadium)

(हेही वाचा- Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग)

२. ८०० कोटी रुपये खर्चून उभारलेलं स्टेडिअम 

स्टेडिअमचं डिझाईन पॉप्युलस या ऑस्ट्रेलियन कंपनीने केलं आहे. इथली मुख्य खेळपट्टीही ऑस्ट्रेलियातच तयार झाली आहे. आणि स्टेडिअमचं बांधकाम लार्सन अँड टुब्रो कंपनीने केलं आहे. सरदार पटेल क्रीडा संकुलाचा भाग असलेल्या या स्टेडिअमच्या आवारातच गुजरात क्रिकेट असोसिएशनचं कार्यालयही आहे. स्टेडिअमच्या उभारणीसाठी ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. ६३ एकर जागेवर वसलेल्या संकुलात ६४ कॉर्पोरेट बॉक्स आहेत, ५५ खोल्यांचं एक क्लब हाऊस आहे. तसंच एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलावही आहे. (World Biggest Cricket Stadium)

३. नमस्ते ट्रंप कार्यक्रम 

फेब्रुवारी २०२० मध्ये स्टेडिअम तयार झालं तेव्हा इथं झालेला पहिला कार्यक्रम हा क्रिकेटविषयी नव्हताच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारत दौऱ्यावर आले असताना ‘नमस्ते ट्रंप’ कार्यक्रम झाला तो या स्टेडिअमवरील पहिला कार्यक्रम होता. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात तिथे टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम झाला होता. त्याच धर्तीवर नमस्ते ट्रंप कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमासाठी स्टेडिअम पूर्णपणे भरून गेलं होतं. (World Biggest Cricket Stadium)

(हेही वाचा- CRIME: कर्नाटकात निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई, ५ कोटी रोख, 106 किलो दागिने जप्त)

त्यानंतर मार्च २०२३ मध्ये इथं बोर्डर – गावसकर चषकातील कसोटी पार पड़ली. आणि त्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अलबानीसही भारतात आले होते. क्रिकेटमधून उभय देशाची ७५ वर्षांची मैत्री या कसोटीपूर्वी साजरी करण्यात आली. आणि नरेंद्र मोदी तसंच अलबानीस यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. (World Biggest Cricket Stadium)

४. भारतातील पहिली रात्र-दिवस कसोटी 

देशातील पहिली रात्र – दिवस खेळलेली कसोटी भरवण्याचा मानही नरेंद्र मोदी स्टेडिअमलाच जातो. २४ फेब्रुवारी २०२१ ला इथं झालेला इंग्लंड आणि भारतादरम्यानचा कसोटी सामना हा देशातील पहिला रात्र – दिवस खेळला गेलेला कसोटी सामना होता. यात गुलाबी चेंडू वापरला गेला. पण, तीन दिवसांच्या आतच कसोटी सामना संपला. (World Biggest Cricket Stadium)

इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात ८१ धावा केल्या. आणि भारतीय संघाने पहिल्या डावात १४५ तर दुसऱ्या डावात बिनबाद ४९ धावा करत कसोटी १० गडी राखून जिंकली. सामन्यांत ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला. या स्टेडिअममधील फ्लडलाईट हे आधुनिक पद्धतीचे आहेत. आणि त्याची रचना अशी आहे की, उभारणीसाठी प्रेक्षकांच्या गॅलरीत एकही पिलर उभारलेला नाही. छतावर असलेल्या वाय कॉलमवर फ्लडलाईट्स लागले आहेत. त्यामुळे जागेचा प्रभावी वापर शक्य झाला आहे. शिवाय फ्लड-लाईट्स एलईडी दिव्यांचे आहेत. (World Biggest Cricket Stadium)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक काळात अवैध मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर नजर, ३ ठिकाणी नाकाबंदी; २१ दिवसांत किती मुद्देमाल जप्त? वाचा सविस्तर)

५. मैदानावरील क्रिकेटचे विक्रम 

जुन्या सरदार पटेल स्टेडिअमवर सुनील गावसकर यांनी कसोटीतील १०,००० धावांचा टप्पा ओलांडला होता. तर सचिन तेंडुलकरनेही १८,००० धावांचा टप्पा इथेच ओलांडला. त्याशिवाय या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या आहे ती श्रीलंकेनं केलेली ७ बाद ७६० ही धावसंख्या. यात महेला जयवर्धनेनं २७५ धावा केल्या होत्या. २००९ ची ही कसोटी अनिर्णित झाली होती. कपिल देव यांनी १९८३ मध्ये याच मैदानावर कपिल देव यांनी एका डावात ९ गडी बाद केले होते. (World Biggest Cricket Stadium)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.