- ऋजुता लुकतुके
क्रिकेटच्या मैदानावर मधोमध असलेला, फारसं गवत नसलेला चौकोनी तुकडा म्हणजे खेळपट्ची. आणि तिचं क्रिकेटमधील महत्त्व काय हे वेगळं सांगायला नको. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील जुगलबंदी रंगते ती इथेच. गोलंदाज धावत येऊन खेळपट्टीवर उभ्या असलेल्या फलंदाजाच्या दिशेनं चेंडू फेकतो. आणि फलंदाज तो टोलवतो. या क्रियेतूनच धावा होणार असतात किंवा फलंदाज बाद होणार असतो. आणि खेळ पुढे सरकणार असतो. असं आहे या खेळपट्टीचं महत्त्व. (Cricket Pitch Length)
(हेही वाचा- Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या)
या लाख मोलाच्या खेळपट्टीची मापं आणि स्वरुप समजून घेऊया.
२२ यार्ड (२०.२ मीटर) लांब आणि १० फूट (३.०५ मीटर) रुंद असा हा मैदानाच्या मधोमध असलेला तुकडा असतो. इतर मैदानाच्या तुलनेत खेळपट्टीवरील गवत अगदी छोटं कापलेलं असतं. किंवा कधी कधी खेळपट्टीवर फारसं गवतच नसतं. खेळपट्टी सपाट असल्यामुळे तिच्यावर आदळलेला चेंडू हा उसळण्याची आणि उंच उडण्याची शक्यता असते. फलंदाजाला उसळीचा अंदाज घेऊन चेंडू खेळायचा असतो. (Cricket Pitch Length)
खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन यष्ट्या रोवलेल्या असतात. त्यांचंच रक्षण फलंदाजाला करायचं असतं. कारण, त्यांना चेंडू लागला तर फलंदाज त्रिफळाचीत होत असतो. अशा दोन बाजूंच्या यष्ट्यांमधील अंतर हे २०.१२ मीटर किंवा २२ यार्डांचं असतं. शिवाय यष्ट्यांच्या मागे दोन्ही बाजूला १.०२ मीटर इतकी जागा सोडलेली असते. गोलंदाजाला चेंडू टाकणं तसंच यष्टीमागे उभा असलेला यष्टीरक्षक यांच्यासाठी ही जागा असते. (Cricket Pitch Length)
(हेही वाचा- Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या)
फलंदाज जिथे पवित्र घेतो त्या रेषेपासून मागे यष्टीपर्यंतचं अंतर हे ३ यार्डांचं असतं. तसंच गोलंदाजाच्या बाजूलाही असतं. (Cricket Pitch Length)
दोन्ही बाजूच्या यष्ट्यांमधील अंतर |
२२ यार्ड |
फलंदाजाला धावून पार करायचं अंतर |
१९.३ यार्ड |
संपूर्ण खेळपट्टीची लांबी |
२४.६ यार्ड |
फलंदाजा पवित्रा आणि यष्टी |
२.७ यार्ड |
खेळपट्टीची रुंदी |
३ यार्ड |
(हेही वाचा- )
खेळपट्टीवर जी ठळक पांढरी रेषा आखलेली असते तिला क्रीज असं म्हणतात. एका बाजूच्या क्रीझवर फलंदाज बॅट रोवून उभा असतो. त्याने चेंडू टाकल्यानंतर या रेषेच्या आत असणं अपेक्षित आहे. तो बाहेर असेल आणि यष्टीरक्षकाने यष्ट्या उडवल्या तर तो बाद दिला जातो. दुसऱ्या बाजूची रेषा ही गोलंदाजाची असते. गोलंदाजाने चेंडू टाकताना या रेषेच्या आतून किंवा किमान त्या रेषेवर राहून चेंडू टाकणं गरजेचं असतं. या रेषेला क्रीझ असं म्हणतात. आणि क्रीझपासून यष्टीपर्यंतचं अंतर जवळ जवळ ३ यार्डांचं असतं. (Cricket Pitch Length)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community