पालघर लोकसभा मतदारसंघातून (Palghar Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी मात्र ते पालघरमधून भाजपाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवणार आहे. सध्या ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्याआधी ते भाजपामधूनच खासदार बनले होते. सलग दोन टर्म ते पालघरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
पालघर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा आग्रही
या मतदारसंघातून (Palghar Lok Sabha Constituency) महायुतीकडून अद्याप मुंबई, ठाणे, कोकणातील काही जागांवर उमेदवारांची घोषणा झाली नाही. त्यातच आता पालघर लोकसभा मतदारसंघातून नवी माहिती समोर येत आहे. या निवडणुकीच्या आधी विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. गावित कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ठाणे, कल्याण हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे पालघर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यात येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिंदे गटातील शिवसेनेत आहे. गावित यांना आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर निवडणुकीला उभे केले जाऊ शकते.
(हेही वाचा Lok Sabha Elections 2024: निवडणुकीनिमित्त मोदींच्या राज्यभरात १० सभा, पहिली सभा सोमवारी चंद्रपूरमध्ये)
२०१८ मध्ये चिंतामण वनगा हे भाजपाचे खासदार होते. परंतु आकस्मित निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. तेव्हा भाजपाने गावित (Rajendra Gavit) यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु राजेंद्र गावित या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना -भाजपा यांच्यात युती झाली. तेव्हा जागावाटपात ही जागा भाजपाने शिवसेनेला दिली. परंतु त्यावेळी येथील खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देत ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार बनले होते.
Join Our WhatsApp Community