Adani Greens RE Park : अक्षय्य ऊर्जा क्षेत्रासाठी अदानी ग्रीन एनर्जी कंपनी करणार १.५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक

खावडा मधील प्रकल्प २०३० पर्यंत देशातील सगळ्यात मोठा अक्षय्य ऊर्जा प्रकल्प म्हणून समोर येईल, असा कंपनीला विश्वास आहे.

171
Adani Greens RE Park : अक्षय्य ऊर्जा क्षेत्रासाठी अदानी ग्रीन एनर्जी कंपनी करणार १.५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक
  • ऋजुता लुकतुके

गौतम अदानी यांची अदानी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २०३० पर्यंत अक्षय्य ऊर्जा प्रकल्पात एकूण १.५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुजरातमध्ये कंपनीचा असलेला ऊर्जा प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे. खावडा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेचा झाल्यावर ५५ गिगावॅट इतकी अक्षय्य ऊर्जा निर्माण होऊ शकेल असा विश्वास कंपनीला वाटतोय. २०३० पर्यंत २४ गिगावॅटची सौर ऊर्जा आणि ४ गिगावॅटची पवन ऊर्जा या प्रकल्पातून मिळू शकेल. (Adani Greens RE Park)

सध्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची ऊर्जा निर्मितीची क्षमता १० गिगावॅटच्या आसपास आहे. आणि कंपनीचे काही प्रकल्प हे १२ राज्यांमध्ये उभारलेले आहेत. आता खावडा इथं एकच मोठा प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. (Adani Greens RE Park)

(हेही वाचा – IPL 2024 Virat Kohli : ऑरेंज कॅप नावावर असूनही विराट कोहलीवर या हंगामात टीका का होतेय?)

खावडा प्रकल्पावर अदानी समूह करणार इतका खर्च

‘चालू आर्थिक वर्षात खावडा प्रकल्पातून ४ गिगा वॅट इतकी अक्षय्य ऊर्जा निर्मिती होऊ शकेल. आधीच इथून ५ गिगावॅटची ऊर्जा निर्मिती होत आहे. म्हणजे आणखी एका वर्षांनी इथली क्षमता १० गिगावॅटवर जाईल. दरवर्षी ५ गिगावॅटची वाढ आम्ही करत जाऊ. आणि त्यातून २०३० पर्यंत ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्टं वाढवत नेलं जाईल,’ असं अदानी समुहाकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. (Adani Greens RE Park)

खावडा बरोबरच देशात इतर ठिकाणीही अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांवर कंपनी काम करत आहे. पण, खावडा मधील प्रकल्प २०३० पर्यंत देशातील सगळ्यात मोठा अक्षय्य ऊर्जा प्रकल्प म्हणून समोर येईल, असा कंपनीला विश्वास आहे. अदानी समुहाचा खावडा येथील प्रकल्प यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला आहे. आणि कच्छ प्रांतातील हा प्रकल्प ५३८ वर्गकिमी इतक्या विशाल क्षेत्रात वसला आहे. आणि येत्या काही वर्षांत या प्रकल्पावर १.५ ट्रिलियन रुपये इतका खर्च अदानी समूह करणार आहे. (Adani Greens RE Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.